शेवगाव - सुप्रसिद्ध अष्टांग योगतज्ज्ञ प.पू.दादाजी वैशंपायन यांच्या
पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगावच्या वैशंपायन नगरमधील दत्त पंढरीत दिं. ७
डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या दत्त जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.यानिमित्ताने
आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन गुरुदत्त
सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके व सचिव फुलचंद रोकडे यांनी केले आहे.
हे स्थान साक्षात्कारी प्रचिती देणारे असून योगतज्ञ प.पू.दादाजी वैशंपायन यांचे मंगलमय आशीर्वाद या स्थानाला प्राप्त आहेत.दत्तजयंती निमित्त मंगळवार दिं.२९ नोव्हेंबर ते सोमवार दिं.५ डिसेंबर दरम्यान ' गुरुचरित्र ' या प्रासादिक ग्रंथाचे पारायण होणार आहे.६ डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता ५१ लक्ष्मी - नारायण जोडप्यांकरवी सामूहिक श्री सत्यदत्त पूजाविधी होणार असून याच दिवशी दुपारी आरती व महाप्रसाद होईल.सायंकाळी नाशिक येथील प.पू.काकासाहेब उर्फ गजानन कस्तुरे गुरुजी यांचे प्रवचन होणार आहे.
0 Comments