दामुआण्णा विद्यालयाची जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड

 

पाथर्डी – येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात पार पडलेल्या तालुका स्तरीय १४ वर्ष वयोगटा खालील मुलींच्या संघांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भिलवडे येथील एकलव्य शिक्षण संस्थेच्या दामुआण्णा माध्यमिक विद्यालयाने नेत्रदीपक यश मिळवल्याने विद्यालयाच्या मुलींच्या खो-खो संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या खो खो स्पर्धेत दामू अण्णा विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी कार्तिकी बडे,प्रतीक्षा बडे,मोहिनी बडे,तेजस्विनी आघाव,ज्ञानेश्वरी बडे,कृतिका सानप,निकिता बडे,पूजा राऊत,प्राजक्ता कराड,ऋतुजा बडे,पलक पालवे व माया डे यांनी विशेष कामगिरी केली.विद्यालयातील शिक्षक रामनाथ चौधरी,बाळासाहेब बडे,माणिकराव पालवे,विक्रम घुले,सूर्यकांत झेंड, व कैलास वाटाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी तसेच संस्थेचे सचिव प्रताप ढाकणे,जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, संस्थेचे विश्वस्थ डॉ.दीपक देशमुख,विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ कानडे,भिलवडे सरपंच मीराबाई बडे,संतोष बडे, भिलवडे येथील ग्रामस्थ यांनी विद्यालयाचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

 


Post a Comment

0 Comments