मोहटा देवस्थान कडून लंपी उपचारासाठी २,९०,००० रुपयांची मदत

पाथर्डी – मोहटे येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट यांच्या कडून सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील लंपी साथरोगाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पशुधनावरील औषधोपचारासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे २,९०,०००/- रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे.

गटविकास अधिकारी जगदीश पालवे यांनी देवस्थान कडे तालुयातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर उपचारासाठी औषध व चारा यासाठी आर्थीक मदतीची मागणी केली होती, त्या अनुषंगाने सदर २,९०,०००/- रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश पाथर्डी येथील दिवाणी न्यायाधीश तथा श्री मोहटादेवी देवस्थानच्या पदसिद्ध विश्वस्त श्रीम. अश्विनी बिराजदार यांनी गटविकास अधिकारी तथा पशुधन विकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांच्या कडे सुपूर्त केला. यावेळी देवस्थानचे माजी विश्वस्त अॅड.विजय वेलदे, अशोक दहिफळे,डॉ.ज्ञानेश्वर दराडे, अशोक दहिफळे,मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे उपस्थित होते. या वेळी बोलताना डॉ. जगदीश पालवे यांनी सांगितले कि सदरची रक्कम पाथर्डी तालुक्यातील लम्पीग्रस्त जनावरांच्या उपचारासाठी तसेच औषधे खरेदी साठी उपयोगी आणली जाईल.

 

Post a Comment

0 Comments