करंजी - शेतातील
तुरीच्या पिकाला पाणी देण्यासाठी चालले असता तु या रस्त्याने परत जायचे नाही,तु या रस्त्याने गेली
तर तुला जिवे मारुन टाकीन, अशी आरोपींनी मला धमकी दिल्याची फिर्याद सातवड येथील महिलेने
दिल्याने पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पाथर्डी तालुक्यातील
सातवड येथे शेतातील तुरीस पाणी देण्यासाठी चाललेल्या फिर्यादी गयाबाई संभाजी चेमटे
महिलेला आरोपी भिवसेन यशवंत पाठक व अलकाबाई आहेर (पुर्ण नाव माहित नाही) यांनी
रस्त्यात अडवून तु या रस्त्याने जायचे नाही म्हणून शिवीगाळ करुन तु या रस्त्याने
शेतात परत गेली तर तुला जिवे मारु अशी धमकी दिल्याच्या माहितीवरून पाथर्डी पोलिस
स्टेशनला भा.द.वि. ३४१, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील
तपास हवालदार अरविंद चव्हाण हे करित आहेत.
0 Comments