शेवगाव तहसिल मधून ट्रॅक्टरचे स्पेअर पार्टस् चोरी

                                          

शेवगाव – गौण खनिज चोरीच्या आरोपाखाली दंड करून तहसील आवारात उभा असलेल्या ट्रॅक्टरचे स्टार्टर,बॉश पंप, बॉशपंपाचे पाईप, फिल्टर, पावर स्टेरिंगचे पाईप, गिझर,डम्पिंग पाईप चोरून नेहले असून याबाबत तहसीलदार छगन वाघ यांनी कानावर हात आणि तोडावर बोट ठेवून जबाबदारी झटकण्याचे धोरण अवलंबले आहे मात्र संबधित ट्रॅक्टर मालकाने तहसीलदार यांच्यावर चुकीच्या कार्यवाइचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे.   

शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ गावचे रहिवासी बंडू ज्ञानेश्वर आर्ले यांच्या मालकीचा स्वराज ७४४ लाल रंगाचा ट्रॅक्टर दि ६ ऑगस्ट २२ रोजी गौण खनिज प्रतिबंधक पथकाने जप्त करून शेवगाव तहसील येथे उभा केलेला असून गौण खनिज चोरी आरोप करत ट्रॅक्टरला शेवगाव तहसीलदार यांनी आर्ले यांना नोटीस देऊ १ लाख १९ हजार ६७५ रुपयांचा दंड झाल्याबाबत कळवले. बंडू आर्ले यांच्या म्हणण्यानुसार ट्रॅक्टर हे घोटण शिवारात पंचर अवस्थेत उभे होते, त्यामधे कोणतीही अवैध वाहतूक नव्हती तरी देखील ट्रॅक्टर पकडून नेला त्यामुळे या विरुद्ध आर्ले यांनी उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांच्याकडे अपील दाखल केली आहे. 

सदरचा ट्रॅक्टर हा तहसीलदार शेवगाव यांच्या ताब्यात आहे. आर्ले हे दिनांक ११ नोव्हेंबर २२ रोजी शेवगाव तहसील कार्यालयातील आवारात सदरचा ट्रॅक्टर पाहण्यासाठी गेले असता ट्रॅक्टरचे स्टार्टर,बॉश पंप, बॉशपंपाचे पाईप, फिल्टर, पावर स्टेरिंगचे पाईप, गिझर,डम्पिंग पाईप चोरून नेल्याबाबत व ट्रॅक्टरची तोडफोड केल्याबाबत तहसीलदार यांना सांगितले असता आम्ही काय वाचमेन आहोत का ? अशा पद्धतीची उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे बंडू आर्ले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून न्याय मिळण्याची मागणी केली आहे. तहसिल कार्यालयाकडून ट्रॅक्टर सोडण्यासाठी माझ्याकडे पैशाची मागणी केली होती परंतु मी देण्यास नकार दिल्याने माझ्या ट्रॅक्टरवर १ लाख १९ हजार ६७५ रुपयांचा अकारण दंड ठोठावला असल्याचे त्यांनी सांगितले. तहसील कार्यालयातील अधिकारी उपस्थीत असताना तेथील जप्त वाहनांचे स्पेअर पार्टस कसे चोरी जातात व याची दखल तहसिलदार का घेत नाहीत हा मोठा प्रश्न असून नेमकी हि चोरी आहे कि हप्त्ते वसुली करणाऱ्या टोळीचे खोडसाळ पणा याबाबत शेवगाव तालुक्यात चर्चेला उधान आले आहे.


Post a Comment

1 Comments