राज्यस्तरीय आंतरशालेय वकृत्व स्पर्धेत राधिका खांबट दुसरी

शेवगाव - महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती तथा थोर विचारवंत पद्मभूषण (स्व.) बाळासाहेब भारदे यांचे स्मृतीदिनानिमित्त शेवगावच्या बाळासाहेब भारदे साक्षरता मंडळाच्या पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय वकृत्व स्पर्धेत वरुर येथील श्री पांडुरंग माध्यमिक विद्यालयाची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु.राधिका एकनाथ खांबट हिने मोठ्या गटात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

तीन हजार रुपये रोख,प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप असून या यशाबद्दल श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील,मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.राजश्री घुले पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.क्षितिजभैय्या घुले,सेक्रेटरी अनिल शेवाळे, सह.सेक्रेटरी आर.एन.मोटेप्रशासकीय अधिकारी भारत वाबळे,मुख्याध्यापक सुशीलकुमार नागपुरे,शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच वरुर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मधुकर वावरे,उपसरपंच गोपाळ खांबट आदींनी कौतुक व अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments