करंजी - लोकसेवा आयोग एसटीआय विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड
झालेल्या गणेश मोरे व किरण मोरे यांनी सातवड गावाची नाही तर परिसराची मान उंच केली
असुन गावातील व परिसरातील तरुणांनी यांचा आदर्श घ्यावा असे मत सातवडचे सरपंच राजेंद्र
पाठक यांनी व्यक्त केले.
पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील गणेश महादेव मोरे व किरण जगन्नाथ मोरे या
तरुणांनी लोकसेवा आयोग एसटीआय विक्रीकर निरीक्षक परिक्षेत यश मिळविल्याबद्दल
त्यांचा सातवड ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी झालेल्या
कार्यक्रमात सरपंच राजेंद्र पाठक बोलत होते. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील तरुणांना उच्च
शिक्षणासाठी अनेक अडचणी येत असतात. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत गणेश मोरे व किरण
मोरे या तरुणांनी हे यश मिळविलेले आहे. सातवड गावात एकाचवेळी दोन तरुण पास
होण्याची ही पहिलीच वेळ असुन या तरुणांच्या यशामुळे उच्च शिक्षणात सातवड गावाचे
नव्हे तर परिसराचे नाव मोठे झाले असुन परिसरातील तरुणांनी या तरुणांचा आदर्श
डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास सरपंच राजेंद्र पाठक, माजी सरपंच कानीफ पाठक,माजी सरपंच संभाजी वाघ,चेअरमन विनायक पाठक, उध्दव पाठक, सुभाष वाघसर, उपसरपंच दादासाहेब सरोदे, अरूण सरोदे, कुशाभाऊ मोरे, जगन्नाथ मोरे,अनिल मोरे, महादेव मोरे,प्रमोद पाठक, सतिष पाठक, कुशाभाऊ पाठक, विजय मोरे, महादेव पाठक, नानासाहेब पाठकसर,अमोल पाठक, भाऊसाहेब पाठक, आण्णासाहेब पाठक, नाना मेजर पाठकसह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ
उपस्थित होते.
0 Comments