अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित पाथर्डी तालुकास्तरीय शालेय खो-खो(मुली )या क्रीडा स्पर्धा पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे श्री विवेकानंद विद्यामंदिर व बाबुजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी येथील क्रीडांगणावर उत्साहात संपन्न झाल्या.
यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी स्पर्धेतील खेळाडूंना मार्गदर्शन केले ते म्हणाले, की शालेय जीवनात विविध क्रीडा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळते. खेळातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यास अधिक मदत मिळते. शालेय जीवनात विविध खेळांच्या माध्यमातून आनंदी जीवन जगता येते तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते . विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात प्रचंड कष्ट करून आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल करावे असे आवाहान केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
व्यासपीठावर पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड , पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील व रामेश्वर कायंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे,मुख्याध्यापक शरद मेढे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, हरिभाऊ कानडे, राजेंद्र शिरसाट,अजय शिरसाट अविनाश घुगे, उपस्थित होते. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पंच म्हणून कामगिरी करणाऱ्या सर्व पंच व क्रीडाशिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके यांनी व आभार शरद मेढे यांनी मानले तर सूत्रसंचालन सतिष डोळे यांनी केले.क्रीडा स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सतीश डोळे, रावसाहेब मोरकर, प्रमोद हंडाळ, सचिन शिरसाट, सूर्यभान दहिफळे, नारायण शिरसाट, संतोष कुलकर्णी, वृषाली कर्नावट, रामदास दहिफळे, उमेश तिजोरे, रामनाथ चौधरी, धनश्री शिरसाठ, आशा गर्जे या क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले.
0 Comments