पाथर्डीतील गंठन चोराला ठोकल्या बेड्या

पाथर्डी – शहरातील मेन पेठेतील घरासमोर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातून जबरदस्तीन मंगळसूत्र चोरणारा चोराला पोलिसांनी घटना घडल्या पासून तासा भराच्या कालावधीत अटक केली असून त्याच्या कडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुरुवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सौ चंद्रकला सुभाषचंद भंडारी ह्या मेनपेठ पाथर्डी येथे घरासमोर उभे असताना अज्ञात आरोपीने त्यांचे गळयातील ३ तोळे वजनाचे ९०,०००/ रुपये किंमतीचे सोन्याचे मणिमंगळसुत्र (गंठण) बळजबरीने गळयातुन हिंसकावुन चोरी करुन घेवुन पळुन गेला त्याबाबत पाथर्डी पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचे गांभीर्य ओळखून पाथर्डी पोलिसानी तपासाचे चक्र फिरवली असता या गुन्हयातील जबरी चोरी करुन पळुन गेलेला संशयीत चोर हा गणेश पेठ पाथर्डी या भागामध्ये असल्याची बातमी मिळाल्यावरुन गुन्हा दाखल झालेनंतर १ तासाच्या आत सदर संशयीत इसमास ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक तपास करता त्याने त्याचे नाव अतुल विजय रोडी वय ३१ वर्ष, गणेश पेठ पाथर्डी असे सांगीतले व त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून चोरलेले सोन्याचे मणिमंगळसुत्र ( गंठण ) एकुण ९०,०००/ रु किंमतीचे स्वतच्या ताब्यातून काढुन दिले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधीकारी आजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पाथर्डी पो.नि सुहास बी. चव्हाण, पो.उपनिरीक्षक एस ए लिमकर, पोकॉ भगवान सानप व इतर अंमलदार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments