मिरी प्राथमिक शाळेला १० बक्षिसे

मिरी - शालेय मुलांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणुन मिरी केंद्रांतर्गत विविध कलागुणांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मिरी प्राथमिक शाळेने वैयक्तिक व सांघिक गटात १० बक्षिसे पटकाविली.

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे मिरी केंद्रांतर्गत शालेय मुलांच्या विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत मिरी केंद्रांतर्गत ११ शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मिरी प्राथमिक शाळेने किलबील गटात व बालगटात वैयक्तिक ८ तर सांघिक गटात २ अशी १० प्रथम क्रमांकाची बक्षीसे मिळविले. केंद्र पातळीवर प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाषराव गवळी, उपाध्यक्ष मनिषा पाटोळे, शाहिद शेख यांच्या हस्ते रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र व शालेय साहित्याचे वाटप करुन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत अझर शेख, अव्दिता गायकवाड, वेदिका डफळ, साक्षी शिंपणकर, श्रेयस शिंपणकर, किर्ती झाडे, साईदिप घायाळ, प्रतिक ससाणे आदि यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे बापु मिरपगार, श्रीराम गवळी, गणेश गवळी,आदिनाथ सोलाट, बालम गवळी, डॉ देशमुखसह अनेक मान्यवरांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments