करंजी - नगर- पाथर्डी महामार्ग
मार्च २०२३ अखेर खड्डेमुक्त होईल, तसेच या
महामार्गाच्या कामासाठी आपण वाढीव साडेआठ कोटी रुपयाचा निधी आणल्याची माहिती
खासदार सुजय विखे यांनी नगर-पाथर्डी महामार्गाच्या कामाची पहाणी करताना दिली.
या एन.एच.६१
महामार्गाचे काम २०१६ साली सुरु झाले होते.या कामास विलंब झाल्याने इतर वस्तुच्या
किंमतीत बदल झाला मात्र टेंडरमध्ये कोणताही बदल न झाल्याने या महामार्गाचे काम
रखडले. या रस्त्याच्या कामाच्या टेंडरमध्ये कोणताही बदल न करता या कामासाठी साडेआठ
कोटी रुपयाचा निधी वाढवुन आणल्याने कामाला गती आली असल्याचेही खासदार सुजय विखे
यांनी सांगुन ते पुढे म्हणाले, मला या रस्त्याचे राजकारण करायचे नाही आणि कोणावरही
टिका-टिप्पणी करायची नाही. आम्ही नैतिक मुल्ये सांभाळुन राजकारण केल्याने गेल्या
५० वर्षापासुन राजकारणात टिकुन आहोत. मला लोकसभेच्या निवडणुकीची वाट पहायची नाही
तर तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतच कळेल या रस्त्याच्या
कडेला असणारी गावे कोणाबरोबर जातात.
यावेळी खासदार सुजय
विखे यांनी नगर-पाथर्डी रस्त्यावरील करंजीजवळील कामाची पहाणी केली. यावेळी
त्यांच्याबरोबर अभय आव्हाड, करंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर,
अरुणसर आठरे, ॲड. मिर्झा मणियार, सुनिल साखरे,पृथ्वीराज आठरे, उपसरपंच नवनाथ आरोळे, संभाजीराव वाघ, बबन अकोलकर,अजय
रक्ताटे,ठेकेदार बबन सबलस सह कार्यकर्त हजर होते.
यापूर्वी रस्त्याचे सात
वर्षा पासून रखडलेले काम मार्गी लागावे यासाठी आ.निलेश लंके व सामाजिक कार्यकर्त्यांनी
केलेल्या उपोषण आंदोलना कडे दुर्लक्ष करणारे राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय
अभियंता स्मिता पवार व शाम तारडे यांनी मात्र विखे यांच्या या दौर्यात हास्य विनोद
करत खा.विखे यांच्या सोबत सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला महामार्ग विभाग अभियंता
यांच्या या दुटप्पी धोरणा बाबत आजबाजूच्या शेतकऱ्यात उलट सुलट चर्चेला उधान आले आहे.
या रस्त्याचे काम लवकरच सुरु केले नाही त्यामुळे तुम्ही या कामात बॅकफुटवर गेले असे वाटत नाही का? असे पत्रकांनी विचारले असता प्रश्नांना उत्तर देताना खा.विखे म्हणाले कि, मि फ्रंटफुटवर खेळणारा खेळाडू आहे. बॅकफूटवर मि जात नसतो असे सांगितले यावेळी उपस्तीत कार्यकर्त्यात हशा पिकला.खासदार सुजय विखे यांनी करंजी येथे शेतात कार्यकर्त्या सोबत जेवण केले.
0 Comments