शाळा खोल्यासाठी शिर्डी संस्थानचा ३० कोटीचा निधी - आ.तनपुरे

मिरी - जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या खोल्यांची मोठी दुरावस्था झाली आहे, या धोकादायक खोल्यासंदर्भात विधानसभेत आपण लक्षवेधी सुचना मांडली होती. त्यासंबंधीचा निर्णय आता झाला असल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी वृध्देश्वर,घाटसिरस, देवराई,मिरी या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी  बोलताना दिली.


आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून पाथर्डी तालुक्यातील वृध्देश्वर,घाटसिरस, देवराई, त्रिभुवनवाडी, लोहसर, राघुहिवरे, मोहोळ बु., मिरी, आडगाव, कामत शिंगवे, जवखेडे खा., जवखेडे बु., कासार पिंपळगाव कोटी ३६ लाखाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मोहोज बु. येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या खोल्यांची मोठी दुरावस्था झाल्याची लक्षवेधी सुचना आपण मागील अधिवेशनात मांडली होती. या शाळा खटल्यासाठी शिर्डी संस्थानने १९१८ साली १० कोटी रुपये दिले होते. शासन निर्णयानुसार हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने करावे असे आदेश दिले मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम करण्यास असमर्थता दर्शविली म्हणुन हे काम जिल्हा परिषदेने करावे असा बदल करणे राहिले होते. त्यासाठी आपण विधी व न्याय खात्याच्या मुख्य सचिवास भेटुन शासन निर्णयात बदल करण्याचे सांगितले त्यावर संबंधित खात्याने आता तसा बदल केला. शिर्डी संस्थान या शाळा खोल्यासाठी ३० कोटी रुपये देणार असुन त्याची अडचण आता दुर झाली असल्याचे सांगुन आमदार तनपुरे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळेच्या खोल्या धोकादायक झाल्या आहेत तर काही ठिकाणी प्राथमिक शाळेच्या खोल्या पाडण्यात आल्या असुन विद्यार्थी झाडाखाली किंवा मंदिरात बसुन शिक्षण घेत आहेत. 

आपण वेळोवेळी मंत्रालयात तसेच जिल्हा नियोजनाच्या बैठकीत याचा पाठपुरावा केल्याने या प्रश्नात यश आले आहे. जिल्हा परिषद प्रशासनकडे माझी मागणी आहे. कोणताही राजकीय भेदभाव न करता ज्या शाळा खोल्यांचे निर्लेखन करुन खोल्या पाडल्या आहेत किंवा खरोखरच ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय आहे. त्या ठिकाणी हा निधी वापरण्यात यावा असेही त्यांनी शेवटी सांगितले.यावेळी सुधाकर वांढेकर, मचेसर,श्रीकृष्ण वांढेकर, शरद कराळे, शिवाजी जाधव,अंबादास डमाळे, संतोष गरुड, राजेंद्र पाठक,जे.बी. वांढेकर, विलासराव टेमकर, अशोक टेमकर,संदिप साळवे,जालिंदर वामन,सय्यदसाहेब,ठेकेदार पागिरेसह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.


Post a Comment

0 Comments