सौर कृषी वाहिनी करता कोल्हारची निवड

 

करंजी - पाथर्डी तालुक्यातील कोल्हार गाव विजेच्या संकटातून आता लवकरच मुक्त होणार असुन कोल्हार गावाची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेकरिता निवड झाली असुन या योजनेंतर्गत सर्व गावातील मोटारी या सौर उर्जेवर चालणार असुन हे जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरणार आहे. 

           पाथर्डी तालुक्यातील कोल्हार गावाची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेकरिता निवड झाली असुन कोल्हार गावातील ८९३ गट नंबरपैकी ५० एकर जमिन महाराष्ट्र राज्य विज मंडळाला देण्यात येणार आहे.त्याठिकाणी सर्व सोलर बसविण्यात येणार आहेत. या सौर उर्जेवर संपुर्ण गावातील शेतीचे पंप चालणार असल्याने या गावातील शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री शेतीच्या पिकाला पाणी देण्याची वेळ येणार नाही. लोडशेडिंग तसेच कमी दाबाने होणाऱ्या विज पुरवठ्यापासुन कोल्हार गावाची मुक्तता होणार आहे. याशिवाय कमि दाबाच्या विजेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी जळुन होणारे नुकसानही टळणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी दिली आहे. या सौर उर्जेवर नियंत्रित विज मिळणार असुन संपुर्ण गावात सिंगल फेज लाईट मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

             कोल्हार गावातील ५० एकर जमिन विज महामंडळास कायम खरेदी खतांची देणार असुन त्यावर डोंगर उतारावर सोलर पंप बसविण्याची ही योजना केंद्र सरकारची असल्याने सर्व खर्च केंद्र सरकार देणार आहे. आज या योजनेसाठी या ठिकाणी सर्व्ह करण्यात आला. यावेळी विज महामंडळाचे इंजिनिअर धीरज गिरडकर,संभाजीराव पालवे, माजी सरपंच बाबाजी मेजर,उपसरपंच कारभारी गर्ज, अनिता नेटके, रावसाहेब जाधव, महादेव गर्ज, गणेश पालवे, नवनाथ जावळे, विज मंडळाचे साईनाथ चिनुक्स अनेक अधिकारी व ग्रामस्थ हजर होते.

Post a Comment

0 Comments