पाथर्डी - माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्य
कुटुंबात जन्म घेऊन राज्याच्या व देशाच्या राजकारणात उत्तुंग भरारी घेत आपल्या
कर्तृत्वाचा ठसा उमटवला.अशा थोर व्यक्तीमत्वास मी नमन करून विनम्र अभिवादन
करते.आजही त्यांच्या कार्याची सर्वसामान्य जनतेला जाणीव आहे.पाथर्डी,शेवगाव तालक्यावर
त्यांचे विशेष प्रेम होते.त्यांच्या विचारानुसार पाथर्डी-शेवगाव तालुका भाजपची
वाटचाल सुरु असून आगामी काळातही सुरुच राहील प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी
केले.
पाथर्डी तालुका
भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडें यांच्या जयंतीनिमित्त
शहरातील स्व.वसंतराव नाईक चौकात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी माजी
नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ.मृत्युंजय गर्जे, माजी पं.स. सभापती सुनीता दौंड, शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवानराव दराडे ,बाळासाहेबांची
शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख विष्णु ढाकणे,युवा मोर्चाचे अमोल गर्जे, शहराध्यक्ष अजय
भंडारी,माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,बंडू बोरुडे ,बजरंग घोडके, धनंजय बडे,अनिल बोरुडे, महेश बोरुडे, सुनील ओव्हळ, भगवान साठे रमेश
हंडाळ,नामदेव लबडे,
रमेश गोरे, शुभम गाडे, प्रा.रमेश काटे, बबन बुचकुल,बबन सबलस, मनिषा घुले, काशीबाई गोल्हार, मंगल कोकाटे, संदीप पठाडे,शिवाजी मोहिते,भगवान साठे,सचिन वायकर,राहुल कारखेले,जमीर आतार,नितीन गर्जे, डॉ.सुहास उरणकर,जगदीश काळे, नारायण पालवे,नवनाथ धायतडक,सचिन पाटसकर
राजेंद्र सप्ते,आदीसह भाजपा पदाधीकारी कार्यकर्त उपस्थित होते.
भाजपा नेत्या माजी
मंत्री पंकजाताई मुंडे यांनी लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती यावर्षी
सामाजिक उपक्रमाने साजरी करावी असे आवाहन केले होते या आव्हानास प्रतिसाद देत
पाथर्डी तालुका भाजपाच्या वतीने मोहिरी रोडवरील निवासी मतिमंद शाळेतील
विद्यार्थ्यांना व मोहटादेवी रोडवरील निवासी मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना
ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाला फळे वाटप करून
स्व मुंडे यांची जयंती साजरी केली यावेळी मतिमंद विद्यालय या संस्थेच्या अध्यक्ष
अनिता निऱ्हाळी, मुख्याध्यापक सचिन तरवडे, प्रताप निऱ्हाळी, बाप्पू गायकवाड,आदिनाथ शिरसाट, नितेश मेघनर, दिनेश गरड, तर मूकबधिर
विद्यालयाचे विश्वस्त नंदकुमार डाळिंबकर, मुख्याध्यापक प्रदीप भोसले,संदीप खोजे,योगिनी क्षीरसागर, सर्जेराव शिर्के,सुनील जरे विशेष,भाऊसाहेब वाघमारे
आदी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमानंतर आमदार मोनिका राजळे ह्या
कार्यकर्त्यांसमवेत गोपीनाथगड येथील स्व.मुंडे यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन
करण्यासाठी परळीच्या दिशेने रवाना झाल्या.
0 Comments