मुंगुसवाडे येथील शेतातून ४.५ किलो गांज्या जप्त


पाथर्डी - तालुक्यातील मुंगूसवाडे गावच्या शिवारातील आरोपी महादेव दादाबा खेडकर याच्या शेतातून स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलिसांनी संयुक्त रित्या धाड टाकून केलेल्या कारवाई ४  किलो ४३० ग्रॅम ओल्या गांज्याची झाडे जप्त केली आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोपनीय खबर्यामार्फत मुंगसवाडे शिवारात महादेव दादाबा खेडकर याच्या शेतामध्ये गांजाची झाडे लावली असून सदरील ठिकाणी धाड घातल्यास मुद्देमाल आढळून येईल अशी गोपनीय खबर मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे,स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे,सपोनि कौशलनिरंजन वाघ,पो.कॉ. सागर मोहिते,समीर शेख,अनिल बडे,भगवान सानप यांच्यासह पोलीस पथकाने सायंकाळी चार वाजता घातलेल्या धाडीत आरोपी महादेव दादाबा खेडकर याच्या शेतामध्ये गांजाची झाडे आढळून आली सदरील ठिकाणी पोलीस पथकाने सदरील गांजाची झाडे वजन ४ किलो ४३० ग्रम जप्त करून पुढील कारवाईसाठी आरोपीला ताब्यात घेवून मुद्देमालासह पुढील कार्यवाहीसाठी पाथर्डी पोलीस ठाण्यात आणले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. 

Post a Comment

0 Comments