पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे श्री विवेकानंद विद्यामंदिर व बाबूजी आव्हाड महाविद्यालय मधील यशस्वी खेळाडूंचा संस्थेचे वतीने नुकताच गुणगौरव समारंभ संपन्न झाला. महाविद्यालयातील व विद्यालयातील तालुकास्तर जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावरील सर्व क्रीडा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे , मुख्याध्यापक शरद मेढे, पर्यवेक्षक संपत घारे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, क्रीडाशिक्षक विजय देशमुख, रावसाहेब मोरकर , सतीश डोळे,प्रमोद हंडाळ, सचिन शिरसाट,सुरेखा चेमटे, विठ्ठल धस,संदीप धायतडक,दीपक राठोड,अनिता भावसार, मनोज ढाकणे,भैय्या थोरात उपस्थित होते तसेच यावेळी बहुसंख्येने पालक उपस्थित होते.
विवेकानंद विद्या मंदिरचे विविध क्रीडा स्पर्धेत तालुक्यात वर्चस्व दिसून आले.यात १४वर्षे वयोगट व १७ वर्षे वयोगट मुले व मुली या संघाने हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.१४वर्ष वयोगट मुले व १७ वर्षे वयोगट मुली या संघाने खो-खो या स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.१४वर्षे वयोगट मुली या संघाने कबड्डी स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला तसेच विद्यालयातील वैयक्तिक क्रीडा प्रकारात ४५ विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. सर्व क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यालयास अजिंक्यपद प्रदान करण्यात आले.यावेळी सर्व खेळाडूंना अल्पोपहार व चहापान देण्यात आलेकार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायके यांनी केले तर आभार विजय देशमुख यांनी मानले.
0 Comments