पाथर्डी - रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग
क्रमांक ६१ चे काम गेली ७ वर्षापासून थांबले असून या मुळे शेकडो लोकांचे अपघातात
प्राण गेले आहेत तरी देखील या भागाचे खासदार व आमदार शासन दरबारी ठोस पाठपुरावा
करत नाहीत म्हणून तसेच या महामार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी पारनेरचे आमदार
निलेश लंके व सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत ७ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु
करत असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला आम आदमी पक्षाच्या वतीने पाठींबा देण्यात आला
आहे.
याबाबत आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष किसन आव्हाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या
पत्रकात म्हटले आहे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे रखडलेले काम मार्गी
लागावे यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने
आजपर्यंत ४०
आंदोलने करण्यात आली. त्यावेळी भाजपा पक्षाचे
विद्यमान आमदार व खासदार तसेच पाथर्डी तालुक्यातील भाजपा पदाधिकारी हे या सामाजिक
प्रश्नावर चमत्कारिक रित्या गप्प बसून होते गेली ७ वर्ष भाजपा पदाधिकाऱ्यांनी रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाबाबत कधीही आंदोलने
केली नाहीत मात्र रखडलेला महामार्ग मार्गी लागावा यासाठी निलेश लंके यांनी
उपोषणाचा इशारा देताच तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी फक्त पेपरमध्ये नाव छापून
येऊन चमकोगिरी करण्याची जुनी पद्धत अवलंबली आहे,जनतेला सर्व वस्तुस्थिती माहित आहे,भाजपा पक्षाचे खासदार राष्ट्रीय
महामार्गाकडे दुर्लक्ष करून या भागात हेलिकॉप्टरने फिरतात, रखडलेल्या महामार्गाबाबत
खासदार विखे यांनी आतापर्यंत ७ ते ८ वेळा खोटी आश्वासने दिली असून सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत, गेल्या चार दिवसापूर्वी
तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी बाबुजी आव्हाड महाविद्यालयातून पत्रकार परिषद घेऊन सोमवारी काम सुरू होण्याबाबत आश्वासन दिले होते ते देखील
फोल ठरले आहे, मात्र सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरती पुढारी फक्त स्टंट करतात व विद्यमान
आमदार या प्रश्नाकडे सोयीस्कर रित्या डोळेझाक करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे
जिल्हा अध्यक्ष
किसन आव्हाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.
उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार
निलेश लंके व सामाजिक कार्यकर्त्यांनी रखडलेल्या महामार्गाचे काम त्वरित सुरू
व्हावे यासाठी सुरू करत असलेल्या आमरण उपोषण आंदोलनास आम आदमी पक्षाच्या वतीने
संपूर्ण पाठिंबा देत असल्याचे देखील पक्षाचे जिल्हा अध्यक्ष किसन आव्हाड
यांनी सांगितले.
0 Comments