पाथर्डी - केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत पाथर्डी तालुक्यातील तीन प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांच्या सुधारणा करणे या कामासाठी रु. ९ कोटीच्या कामांना दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी मंजूरी मिळालेली आहे.
या रस्त्यांच्या कामासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दि. २२ जून २०२२ रोजी पत्र दिले होते, त्यानुसार या कामांना मंजूरी मिळाली, ही कामे मंजूर होणेसाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे सहकार्य लाभले. यामध्ये अमरापुर-सुसरे-सोमठाणे प्रजिमा-३० या रस्त्यासाठी रु. ४ कोटी,जवखेडे-कासारपिंपळगांव रस्ता प्रजिमा-१६३ या रस्त्यांसाठी रु. २.५० कोटी त्याचबरोबर कोरडगांव-बोधेगांव रस्ता प्रजिमा-३९ या रस्त्यासाठी रु. २.५० कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. या तीनही रस्त्यांची सुधारणा करणेसाठी नागरीकांची मोठया प्रमाणात मागणी होती. मागील वर्षीही केंद्रीय मार्ग निधी मधून दुलेचांदगांव-वसुजळगांव-कोरडगां
0 Comments