जनता व प्रसार माध्यमांच्या दबावातून व्यापक जनहिताचे प्रश्न मार्गी लागतात - ॲड.हरिहर गर्जे


पाथर्डी - व्यापक जनहिताच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यावर जनतेचा व प्रसार माध्यमांचा दबाव वाढवण्याची गरज असून लोकांमध्ये जागृती घडवून विकास कामांसाठी आग्रही राहणारी पिढी समाजाची निकोप घडी बसवू शकते असे मत सामाजिक कार्यकर्ते ॲड.हरिहर गर्जे व्यक्त केले.

पाथर्डी तालुक्यातून जाणार्या रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या आंदोलनात यशस्वी सहभाग घेऊन प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याबद्दल वनदेव मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य ॲड.गर्जे यांचा ग्रुपच्या वतीने वनदेव मंदिराच्या प्रांगणात गौरव करण्यात आला. यावेळी योगेश घोडके,सतीश एडके,राजेंद्र एडके,गणेश पंडित,सुरेश इजारे,जगन्नाथ शेळके,आदिनाथ भस्मे,सुभाष केदार,उद्धव कोलते,ओम दहिफळे, जय ढाकणे,अशोक मंत्री,डॉ.संतोष जाधवर,डॉ विलास बाहेती,किशोर पारखे,अशोक देखणे, विठ्ठल मंत्री, विस्तार अधिकारी रानमळ आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेहकरी ते फुंदे टाकळी या दरम्यान रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी झालेल्या उपोषण आंदोलनात आमदार निलेश लंके यांचे सोबत ॲड.हरिहर गर्जे यांनी सक्रीय सहभाग नोंदवत चार दिवस आमरण उपोषण आंदोलन केले व महामार्गाचे काम सुरू झाल्यावरच आंदोलन मागे घेतले. गेली सात वर्ष गर्जे यांनी याबाबत विविध माध्यमातून पाठपुरावा करत प्रशासनाची लक्ष वेधले आहे. यावेळी विविध सदस्यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलताना गर्जे पुढे म्हणाले कि महामार्गाचे काम लगेच सुरू झाले यासाठी सर्वांचे सामुहिक प्रयत्न व प्रसार माध्यमांचा दबाव व आंदोलकांचा संघटित निर्धार उपयोगी ठरला.पाथर्डी शहरातही अनेक लोकप्रश्न प्रलंबित असून काही विकास कामा बाबत केवळ आभास निर्माण करण्यात आला आहे. पक्ष व राजकारण विरहित नागरिकांचे प्रभावी व्यासपीठ उभारून आगामी काळात समविचारी लोकांना एकत्रित घेऊन लोक चळवळ उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सामाजिक व सार्वजनिक कार्याची प्रेरणा आपल्याला वन देव ग्रुप मधूनच मिळाली असून राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील गैरकारभाराच्या चौकशीची मागणी आपण सोडलेली नसून सर्व सहकार्यांसमवेत पाठपुरावा चालू ठेवणार असल्याचे सांगून गर्जे यांनी आंदोलनाची वाटचाल विस्तृतपणे मांडली. यावेळी वनदेव मोर्निंग ग्रुप चे अध्यक्ष अविनाश मंत्री यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.

Post a Comment

0 Comments