पाथर्डी - ज्येष्ठ नेते शरद
पवार यांच्या पुरोगामी विचार व दूरगामी दृष्टिकोनामुळेच महाराष्ट्र व देशातील
शेतकऱ्यांचा विकास होऊ शकला कृषी क्षेत्रासह उद्योग सिंचन अशा क्षेत्रासाठी
पवारांचे प्रचंड मोठे योगदान असून महाराष्ट्राला आज खऱ्या यांचे विचार व
नेतृत्वाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड.
प्रतापराव ढाकणे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
हिंद वस्तीगृह येथे पक्षाच्या व्हँर्चुअल रॅलीत अँड ढाकणे संबोधित करीत होते यावेळी
राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे होते.माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे,डॉ.दीपक
देशमुख रामराव चव्हाण डॉक्टर राजेंद्र खेडकर राजेंद्र नांगरे सिताराम बापू बोरूडे
अनिल ढाकणे चंद्रकांत भापकर योगेश रासने दिगंबर गाडे हुमायून आतार देवा पवार आक्रम
आतार अतिश निराळी अनिकेत निनगुरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अँड. ढाकणे म्हणाले शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शरद पवार यांनी
अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले कृषी मंत्री असताना सत्तर हजार कोटी रुपयांची
कर्जमाफी हा स्वतंत्र भारताला ऐतिहासिक निर्णय घेण्याचे धाडस दाखविले व देशातील
अडचणीतील शेतकऱ्यांना सावरले राज्याचे मुख्यमंत्री असताना पवारांनी
महाराष्ट्राच्या सर्वांगीक विकासासाठी पायाभूत सुविधा उभारल्याने हाच राज्याची
प्रगती नजरेत पडते.सिंचन व्यवस्था वाढविण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना
राबविल्या तरुणांच्या रोजगारासाठी औद्योगिक क्षेत्राचा विस्तार केला त्यामुळे लाखो
हातांना रोजगार मिळवून त्यांचे जीवनमान उंचावले तसेच महिलांना स्थानिक स्वराज्य
संस्थेमध्ये ५० % आरक्षण मिळवून दिले. शरद पवार हे केवळ राष्ट्रवादीचे
नेते नसून अखंड भारताचे जननायक आहेत म्हणून अशा नेतृत्वाची व त्यांच्या पुरोगामी
विचारांची आज देशाला व राज्याला आवश्यक आहे असे ढाकणे शेवटी म्हणाले.यानंतर
कार्यकर्त्यांसह मा ढाकणे यांनी घनकचरा संवर्धन करत कचरा निर्मूलन करणे तसेच
वृक्षारोपण देखील करण्यात आले.पाथर्डी शहरातील माणिकदौंडी चौकात ढाकणे यांनी
स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला अभिवादन केले.
0 Comments