पाथर्डी - मोहोज देवढे येथील म्हशी चोरणारया आरोपीकडून फिर्यादी सेवारथ सैनिकास धमकी
मिळत असल्याने कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन त्रिदल माजी सैनिक सेवा संघ पाथर्डी यांच्या
वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
त्रीदल सैनिक संघ पाथर्डी शाखेचे सदस्य अरुण
नारायण बेळगे व अविनाश नारायण बेळगे हे आर्मीच्या सेना शाखेत सेवारत असून यांच्या
म्हशी १ ऑगष्ट २०२२ रोजी चोरी
गेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पोलीस तपासात
आरोपी अजिनाथ बाळू मेरड रा.मेरडवाडी ता.आष्टी जि.बीड आरोपी पांडूरंग भाउराव गोयकर रा.मोहोजदेवढे ता. पाथर्डी आरोपी प्रकाश जालिंदर
ठोंबरे रा. मांगेवाडीता. शिरुर जि.बीड हे पकडले गेले होते व सदर गुन्हयाची केस
न्यायप्रविष्ठ असून आरोपी कडून चोरी गेलेल्या दोन म्हशी पैकी एक म्हैस हस्तगत झाली
असून दुसरी म्हैस आरोपींनी बीड जिल्हयातील हिरापूर बाजारात विकली आहे सदर
गुन्हयातील आरोपी पांडूरंग भाउराव गोयकर यांचे वडील भाउराव गोयकर पिडीतांच्या घरी
दारु पिवून येउन केस मागे घेण्यासाठी धमकावत असल्याची फिर्याद नारायण भगवान बेळगे
यांनी दिली असून त्यांची दोनही मुले सैन्यदलात सेवारत आहेत.फिर्यादीचे मुले घरी
नसतांना पिडीत कुटुबांना कुणाचाच आधार नसल्यामुळे आरोपी कडून फिर्याद मागे
घेण्यासाठी धमक्या मिळत असून आरोपीवर कडक कारवाई करण्यासाठी पाथर्डी तालुका त्रीदल
संघाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी त्रिदल सैनिक सेवा
संघ तालुका पाथर्डी अध्यक्ष गोवर्धन विक्रम गर्जे, उपाध्यक्ष रोहिदास एडके, सचिव शरद आव्हाड, सहसचिव मधुकर चनने, कमिटी सदस्य विठ्ठल तांदळे, अहमदनगर ग्रामीण अध्यक्ष अशोक
गोरे, कोरडगाव गट अध्यक्ष भानुदास
केदार खरवंडी कासार गट अध्यक्ष पंपू गोल्हार, प्रल्हाद ढाकणे, अन्वर पठाण, भीमराज पाटेकर,अशोक घुगे, अर्जुन शिरसाठ, अण्णा घुले यासह
तालुक्यातील विविध गावामधून संघटनेचे सभासद उपस्थित होते.
0 Comments