पाथर्डी - नगर परिषद द्वारा आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता करा मधून माजी सैनिकांना शासनाच्या आदेशाप्रमाणे सूट मिळत नसून शासनाच्या आदेशाचे पालन करून करात तत्काळ सवलत देण्याची मागणी त्रिदल माजी सैनिक सेवा संघ पाथर्डी यांच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.
मागील दोन वर्षापासून पाथर्डी
तालुक्यातील माजी तसेच आजी सैनिकास येणाऱ्या अडचणी आणि इतर सामाजिक कार्यात त्रिदल
सैनिक सेवा संघ कार्यरत असून तालुक्यातील आजी माजी सैनिकांच्या मालमत्ता करात
शासनाच्या आदेशा प्रमाणे पालिका सवलत देत नाही त्यामुळे शासन आदेशाची अवहेलना होत
असून नगरपरिषद पाथर्डी मालमत्ता कर जो कि महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक २०१६/प्र
क्र. ५९/नवी-२० दि ०९ सप्टेंबर २०२० (संलग्न प्रत) माफ केलेला असूनदेखील नगरपरिषद
पाथर्डी, द्वारा माजी सैनिक व त्यांच्या पाल्याकडून जास्तीचा कर वसूल केला
जात आहे. तो पूर्णतः माफ करण्या बाबत मुख्याधिकारी यांना सूचना देण्याची मागणी
करणारे निवेदन नायब तहसीलदार श्री बागुल यांना देण्यात आले.
याशिवाय येत्या ०५ जानेवारी २०२३
पर्यंत नगर परिषद पाथर्डी द्वारा कर माफी अंमलबजावणी करण्यात आली नाही तर त्रिदल
माजी सैनिक सेवा संघ पाथर्डी द्वारा दिनांक १० जानेवारी २०२३ पासून नगर परिषद
पाथर्डी समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी त्रिदल सैनिक सेवा संघ तालुका पाथर्डी अध्यक्ष गोवर्धन
विक्रम गर्जे, उपाध्यक्ष रोहिदास एडके, सचिव शरद आव्हाड, सहसचिव
मधुकर चनने, कमिटी सदस्य विठ्ठल तांदळे, अहमदनगर ग्रामीण अध्यक्ष अशोक गोरे, कोरडगाव गट अध्यक्ष भानुदास केदार खरवंडी कासार
गट अध्यक्ष पंपू गोल्हार, प्रल्हाद ढाकणे, अन्वर पठाण, भीमराज पाटेकर,अशोक घुगे, अर्जुन शिरसाठ, अण्णा घुले यासह तालुक्यातील विविध गावामधून संघटनेचे सभासद
उपस्थित होते.
0 Comments