प्रा.किरण गुलदगड यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात पीएच.डी.पदवी


पाथर्डी - येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. किरण गुलदगड यांना जेजेटी विद्यापीठ राजस्थान यांचेकडून पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.

त्यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात डॉ. राजकुमार घुले यांच्या मार्गदर्शनखाली "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित अहमदनगर जिल्ह्यातील महाविद्यालयीन ग्रंथालयांमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माहितीविषयक गरजा व माहितीच्या शोधवर्तनाचा विश्लेषणात्मक अभ्यास" या विषयावर संशोधन प्रबंध विद्यापीठास सादर केला होता.या संशोधनाचा उपयोग ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार असून सदर परीक्षांचा अभ्यास करतांना कोणते संदर्भसाहित्य वाचणे आवश्यक आहे तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करतांना कोणत्या अडचणी येतात व महाविद्यालयीन ग्रंथालये या विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याबरोबच कोणत्या सुविधा पुरवितात याविषयी सविस्तर संशोधन करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील महाविद्यालयीन ग्रंथालयांमध्ये अभ्यास करून तसेच महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेऊन मागील ५ वर्षात किती विद्यार्थी शासकीय सेवेत भरती झाले याविषयी विश्लेषणात्मक मांडणी या संशोधन प्रबंधात करण्यात आली आहे. 

प्रा. किरण गुलदगड हे मागील १४ वर्षापासून बाबुजी आव्हाड महाविद्यालयात ग्रंथपालपदावर कार्यरत असून त्यांचे ग्रंथालयशास्त्राशी निगडीत विविध विषयांवर संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, सुनील साखरे, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, मार्गदर्शक डॉ. राजकुमार घुले, पर्यवेक्षक प्रा. शेखर ससाणे व महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments