स्व.राजीव राजळे ५३ वी जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी

 

पाथर्डी - माजी आमदार स्व. राजीव राजळे यांची 53 व्या जयंती निमित्त शेवगाव पाथर्डी मतदारसंघासह जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरी करण्यात आली.

कासार पिंपळगावच्या सरपंच मोनाली राजळे यांनी कोरडगाव येथे माजी आमदार राजीव राजळे यांच्या 53 व्या जयंती निमित्त आयोजित मुलींच्या खो-खो स्पर्धेचे व नवीन प्रयोगशाळांचे  उदघाटन केलें. यावेळी वृध्देश्वरचे संचालक श्रीकांत मिसाळ, माजी जिल्हा परीषद सदस्य राहुल राजळे, बाबासाहेब किलबीले, नारायण काकडे, मधुकर देशमुख,भास्करराव गोरे आदि उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविदयालय यांना प्रथम क्रमांक, सावित्रीबाई फुले विदया मंदीर व्दितीय तर श्री हरिहरेश्वर कला व विज्ञान महाविदयालयाच्या संघास तृतीय क्रमांक मिळाला असुन या स्पर्धाचे आयोजन महाविदलयालयाचे प्राचार्य,डॉ.दादा मरकड, प्रा.उमेश तिजोरे, ओमप्रकाश देशमुख, रोहीत देशमुख, पोपट जाधव, महेश काटे, गणेश म्हस्के,गणेश गरड, आदि शिक्षक वृद यांनी केले. तालुका शेतकीय माल खरेदी विक्री संघाच्या वतीने स्वर्गीय माजी आमदार राजीव राजळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. अनिल गुगळे, संतोष भागवत,सिंधू साठे आदी उपस्थित होते.

स्व लोकनेते राजीवजी राजळे यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे माजी नगरसेवक रामनाथ बंग मित्र मंडळाच्या वतीने दोन हजार लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण सोहळा आज शंकर महाराज मठाचे मठाधिपती परमपूज्य माधव बाबा,भैरवनाथ देवस्थानचे प्रमुख भाऊसाहेब मर्दाने,ह भ प शशिकांत महाराज सोनवणे,उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ सचिन दरंदले,डॉ मनीषा खेडकर,राजू शेठ गुगळे,अशोक साठे,रामकिसन पंडित,बंडू दानापुरे,अण्णा हारेर, शहानवाज शेख,राजेंद्र दुधाळ,डॉ सचिन गांधी,रामराव बारगजे, राम बजाज,किशोर परदेशी,सचिन नागापुरे यांच्या हस्ते भाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संपन्न झाला.सूत्रसंचालन प्रशांत रोडी यांनी तर प्रास्ताविक सचिन नागापुरे यांनी करून आभार बबलू वावरे यांनी मानले.

श्रीराम प्रतिष्ठान व माजी आमदार राजीव राजळे मित्र मंडळ यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून समाजाच्या हिताचे व स्व.राजाभाऊंना नेहमी अभिप्रेत असलेले कार्य केले.शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी  डॉ.निलेश म्हस्के, डॉ.वसंत झेंडे, डॉ.विलास मढीकर, रामकिसन आबा काकडे, सुभाष अण्णा ताठे, श्रीकांत मिसाळ, बाळासाहेब गोल्हार,काकासाहेब शिंदे, बाबासाहेब किलबिले,चारुदत्त वाघ,प्राचार्य राजधर टेमकर , बाळासाहेब ताठे, विनायक म्हस्के,वसंत भगत,सचिन नेहुल, डी.व्ही.म्हस्के,अंकुश  राजळे,सुधीर शिंगवी,संभाजी राजळे,अविनाश राजळे ,प्रमोद म्हस्के उपस्थित होते.

पालवेवाडी येथेही जयहिंद  वाचनालयात जयंती साजरी करण्यात आली.या वेळी अध्यक्ष नारायण पालवे ,सचिव आसाराम पालवे,राजू पालवे,अनिल पालवे,झुंबर आंधळे,भाऊसाहेब पालवे,आसाराम आंधळे,बाळू पालवे,आदी उपस्थितीत होते.पाथर्डी तालुक्यातील अकोला येथील संत भगवानबाबा महाविद्यालयात आमदार राजीव राजळे यांच्या जयंती निमित्त साजरी करण्यात आली.डॉ.सोनल गर्जे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब गर्जे, संस्थेचे सचिव गंगाधर गर्जे,दत्तात्रय गर्जे,ॲड.राहुल गर्जे,हर्षद गर्जे,दिपक कर्डिले,बाळु कर्डिले उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments