पाथर्डी – आगसखांड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक
शाळेत ज्ञानदानाचे पवित्र काम करण्याची जबाबदारी असणारया दोन शिक्षकांचे शाळेतच वाद
शिगेला पोहचून मुख्याध्यापक व शिक्षकाने एकमेकांना शाळेतील विद्यार्थी व
विद्यार्थिनी समोर अश्लील शिव्यांची लाखोली वाहत एकमेकांवर धावून एकमेकांची कॉलर
पकडून शिक्षकि पेशाला काळिमा फासण्याचे गैरकृत्य केले असून या गैरकृत्या बाबत ग्रामस्था
मधून या दोनही शिक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आगसखांड येथील मुख्याध्यापक गंगा सुपेकर हे त्यांच्या
भालगाव गावी ग्रामपंचायत निवडणूक असल्याने रजेवर गेले होते मात्र त्यांच्यावर
शालेय पोषण आहार पूर्तता करण्याची जबाबदारी असताना त्यांनी ती पूर्ण केली नाही
त्यामुळे त्यांच्या पश्चात विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला नाही व त्रास सहन
करावा लागला. रजा संपल्याने सुपेकर हे परत आल्यावर त्यांना सह शिक्षक गोल्हार
यांनी याबाबत जाब विचारला मात्र मुख्याध्यापक महोदयांचा ग्रामपंचायत पॅनल पराभूत
झाल्याने डोक्यात राग असल्याने मुख्याध्यापक महोदयानी आव देखा ना ताव अन मग काय सह
शिक्षक असलेल्या सहकारी शिक्षक गोल्हार यांना मोठमोठ्याने शिवीगाळ सुरु केली, मग
काय शब्दाने शब्द वाढला अन दोनही शिक्षकांनी पद,सामाजिक भान,जबाबदारी यांच्या सर्व
सीमा ओलांडत येथे एकमेकांना शिव्याची मनसोक्त लाखोली वाहत विद्यार्थ्या समोर एकमेकांच्या
आई वडिलांचा उद्धार करत शिव्या देताना हत्ती,घोडे,बैल यासह कुत्रे देखील मदतीला घेतली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक अगदी गावरान अन अश्लील भाषेत भांडताना पाहून त्या
ठिकाणी गर्दी केली व आवडत्या शिक्षकांना शिट्ट्या अन आरडाओरडा करत चेअर अप करण्यास
सुरवात केली. मात्र आरडाओरडा व शिवीगाळ शिक्षकांची धरपकड पाहून त्या ठिकाणी
ग्रामस्त जमा झाले अन त्यांनी या दोनही शिक्षक महोदयांचे भांडण सोडवले मात्र तरी
देखिल मुख्याध्यापक महोदयांच्या ग्रामपंचायत निवडणुकीची हवा डोक्यातून उतरेना ते
मात्र सह शिक्षकाला जीवे ठार मारण्याच्या धमक्या देतच होते.
दोनही शिक्षकांची या ठिकाणहून बदली करण्याची
मागणी ग्रामस्थानी शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली असून उद्या शाळा बंद ठेवण्याचे
निर्णय ग्रामस्थानी घेतला आहे. पुढारी पाठबळाचे वलय लाभलेले गुरुजी विद्यार्थ्यांचे
काय भले करणार हा प्रश्न उपस्तीत होतो. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी महिती समजून
देखील शिक्षण अधिकारी अनिल भवर हे या शाळेकडे का फिरकले नाहीत, त्यांच्यावर कोण
पुढार्याचा दबाव आहे का ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत .. क्रमश
0 Comments