पाथर्डी – आगसखांड
येथील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व सहशिक्षकाने शाळेत विद्यार्थ्या समोर
बेशिस्तीचे प्रदर्शन करत एकमेकांना अश्लील शिवीगाळ व हाणामारी केल्या बाबतच्या
घटनेचे अधिराज्य वेब पोर्टल मधून वृत्त प्रकाशित होताच पंचायत समिती गटविकास
अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांनी आगसखांड जिल्हा परिषद शाळेला भेट देवून शाळा व
शिक्षकांची झाडाझडती घेत घटनेची चौकशी केली.
आगसखांड
शाळेतील मुख्याध्यापक गंगा सुपेकर व सह शिक्षक गोल्हार यांच्यात शालेय पोषण
आहाराच्या कारणावरून गुरवारी शाळा सुरु असताना चिमुकल्या विद्यार्थ्या समोर व
ग्रामस्था समोर हाणामारी व शिवीगाळ झाली होती याबाबत ग्रामस्थांनी या बेशिस्त शिक्षकावर
कारवाई होई पावेतो शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता त्याचा अनुषंगाने पंचायत
समिती गट विकास अधिकारी जगदीश पालवे तसेच गट शिक्षण अधिकारी अनिल भवर यांनी
शुक्रवारी सकाळी या शाळेत जावून शाळा तपासणी केली यावेळी अधिकाऱ्यांना शालेय
अभिलेखात अनेक उणीवा निदर्शनास आल्या तसेच या दोनही शिक्षकानी शाळेच्या आवारात व
सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करून,अश्लील शिवीगाळ करून पद,प्रतिष्ठा तसेच शासनाची व
शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन होईल असे कृत्य केल्याचे विद्यार्थी तसेच स्थानिक
ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सांगितले त्यामुळे गट विकास अधिकारी डॉ पालवे यांनी
तसेच गट शिक्षण अधिकारी अनिल भवर यांनी संबधित शिक्षकांना चांगलेच धारेवर धरत झापले,
प्रकरण अंगाशी आल्याचे लक्षात येताच मुख्याध्यापक गंगा सुपेकर व सहशिक्षक गोल्हार यांनी
उपस्थित ग्रामस्थ व अधिकाऱ्यांकडे घटनेची कबुली देत, झाले प्रकारा बाबत लेखी माफी मागितली.
.jpeg)
याशिवाय संबधित मुख्याध्यापकांनी या प्रकरणात
आपल्यावर कार्यवाही होवू नये म्हणून वरिष्ठ राजकीय पातळी वरून चौकशी अधिकाऱ्यांना
फोनाफोनी करून अहवाल अहमदनगर जिल्हा परिषदेला न पाठवण्याची गळ घातली आहे त्यामुळे
पुढे कार्यवाही होते कि नाही या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाचा
गलेलट्ठ पगार घेवून ज्ञानदानाच्या कामाला फाट्यावर मारून स्थानिक राजकारणात रस
घेणाऱ्या शिक्षकांना कोण पुढारी पाठीशी घालत आहे ? याबाबत तालुक्यात चर्चेला उधान
आले आहे. गुन्हा करून प्रकरण अंगाशी येताना दिसताच कबुली देवून माफीनामा सादर
करणाऱ्याना शिक्षण विभाग शास्ती देणार कि अभय हा प्रश्न जनसामान्यांच्या मनात उभा
राहिला आहे. या शिवाय या पूर्वी या प्रकरणातील मुख्याध्यापक महोदयांना न्यायालयाने
अश्याच एका हाणामारीच्या खटल्यात दोषी धरत शिक्षा सुनावलेली असून वरिष्ठ
न्यायालयात त्याचे अपील सुरु आहे मात्र इतर वेळी अश्या घटना मधून तत्काळ निलंबनाची
प्रक्रिया राबवणारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग अश्या शिक्षकांना विशेष वागणूक
कोणत्या पुढाऱ्याच्या सांगण्या वरून देतो याबाबत देखील प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यात
ज्ञानदानाचे काम सोडून सोयीस्कर रजा न टाकता खाजगी उद्योग करणारे, राजकारण करणारे,
सरकारी पगार घेवून २४ तास पुढाऱ्याच्या सतरंज्या उचलणारे शिक्षकी पेशाला बदनाम करत
आहेत, त्यामुळे प्रामाणिक शिक्षकांना घुसमट व अवहेलना सहन करावी लागते. उद्याच्या
उज्वल भवितव्यासाठी अश्या बेलगाम व बेशिस्त शिक्षकांना दया न दाखवता त्यांनी
केलेल्या गैरकृत्याची शिक्षा हि झालीच पाहिजे अन्यथा जिल्हा परिषदेच्या शाळेतून अश्या
गुंड शिक्षकाच्या हातून उद्याची सुसंस्कारी पिढी घडणार नाही हे तितकेच सत्य आहे ...
क्रमश
0 Comments