वसंतदादा विद्यालयाने आदर्श व्यक्ती घडवल्या - महेंद्र शिरसाठ

 

पाथर्डी – गोरगरीब,कष्टकरी,मजूर तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी स्व.सहदेवदादा शिरसाठ यांनी वसतिगृह अन शाळा सुरु करत अनेक आदर्श व्यक्तीमत्व घडवले असल्याचं प्रतिपादन संस्थेचे सचिव महेंद्र शिरसाट यांनी केले.

शाळेचे माजी विद्यार्थी समाजसेवक पोपटराव फुंदे यांच्या पत्नी श्रीमती अनुराधा केदार यांची मोहटादेवी देवस्थानच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शिरसाठ यांनी आईवडिलांसोबत शाळा आणि शिक्षक यांचा व्यक्तीमत्व जडणघडणीत मोलाचा वाटा असतो हे सांगतांना आपल्याला मिळणार्‍या पगाराचा अर्धा हिस्सा समाजासाठी खर्च करत निरपेक्ष भावनेने समाजकार्य करणार्‍या फुंदे दाम्पत्याचा सत्कार करतांना शाळेला मोठा अभिमान वाटत असल्याचे सांगितले.यावेळी बोलताना विश्वस्त अनुराधा केदार म्हटल्या की देवस्थानला गोरगरिबांच्या घामातून आलेली देणगी सत्कारणी लावतांना देवस्थानचा खर्च कमी व उत्पन्न वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत देवस्थानचा विकास साधत भक्तांना जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल शिरसाठ,वसंतदादा विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments