करंजी - पाथर्डी तालुक्यात अनेक ठिकाणी मोफत रोग
निदान शिबीराचे आयोजन केले जाते या शिबिराचा लाभ घेवुन नागरिकांनी आपल्या
आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जगदीश
पालवे यांनी मांडवे येथील मोफत रोग शिबिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रमुख
पाहुणे म्हणुन बोलताना केले.
पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र देवराई व साई माऊली
सुपर स्पेशालिस्टी हॉस्पिटल अहमदनगर आणि ग्रामपंचायत मांडवे यांच्या संयुक्त विद्यमाने
मोफत तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी बोलताना जगदिश पालवे पुढे
म्हणाले, तालुक्यातील अनेक गावात असे मोफत रोग
निदान शिबीरे शासनाच्यावतीने तसेच काही संस्थांच्या सहभागाने आयोजित केले जातात.
नागरिकांनी अशा शिबीरात आपली तपासणी केल्यास वेळ व आर्थिक हानी हानी टाळावी या
आरोग्य शिबिरात अनेक नागरिकांनी मोफत तपासणी करून घेतली.
श्री मांडवेश्वर देवस्थान सभा मंडपामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र देवराई व
साई माऊली सुपर स्पेशालिस्टी हॉस्पिटल अहमदनगर आणि ग्रामपंचायत मांडवे यांच्या
संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन पाथर्डी तालुका आरोग्य
अधिकारी डॉ.भगवान दराडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पाथर्डी तालुका गटविकास
अधिकारी डॉ.जगदीश पालवे, तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे
डॉ.बाबासाहेब होडशिळ, डॉ.गणेश घोरड, साई माऊली सुपर स्पेशलिस्टी हॉस्पिटलचे
डॉ.संतोष गीते, ग्रामसेविका सविता घुले, सरपंच राजेंद्र लवांडे,उपसरपंच मनीषा शिंदे यांच्यासह अनेक
मान्यवर उपस्थित होते.तसेच गावातील सर्व नागरिकांनी आरोग्याची मोफत तपासणी करून
घेण्याचे आवाहन तालुका आरोग्याधिकारी दराडे यांनी केले. या मोफत आरोग्य तपासणी
शिबिरामध्ये साई माऊली सुपर स्पेशलिस्टी हॉस्पिटलचे डॉ.संतोष गीते यांनी
नागरिकांना मधुमेह,काविळ, यकृताचे आजार, उच्च रक्तदाब, दमा, फुफ्फूसाचे आजार, थायरॉईड, किडनी, टी.बी. सर्पदंश व
विषबाधा या संदर्भात माहिती दिली.या शिबिरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, इ.सी.जी,पी.एफ.टी ची
तपासणी मोफत करण्यात आली. या शिबिरामध्ये सदाशिव पावशे,जगन्नाथ लवांडे, विठ्ठल निर्मळ, राजेंद्र लवांडे, रामदास लवांडे, हमीद मोगल,गणेश लवांडे यांच्यासह अनेक नागरिकांनी आरोग्याची मोफत
तपासणी करून घेतली.
0 Comments