वामनभाऊनगर मधील नागरी समस्या जटील,नागरिक आक्रमक



पाथर्डी - संत वामनभाऊ नगर व आनंदनगर मधील अर्धवट राहिलेली गटार व रस्त्या मुळे येथील नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असून या समस्यांच्या सोडवणुकीसाठी युवा नेते सचिन नागपुरे यांच्या नेतुत्वाखाली नागरिकांनी पालिकेला त्रीव्र आंदोलनाचा इशारा दिले आहे.

आनंदनगर व वामनभाऊ नगर मधील रखडलेला रस्ता तात्काळ पुर्ण करावी यासाठी या भागातील नागरिकांनी अनेकदा नगरपालिका व नगरसेवक यांच्याशी संपर्क केला असता तरीही संत वामनभाऊ नगर मधील कराड सर, राजगुरु सर यांच्या घरा समोरील रस्ता सहा महिन्या पासून अर्धवट सोडला आहे. तसेच आनंदनगर मधील अर्जुना लाँन्स च्या मागील अर्धवट गटारी चे काम मागील एक वर्षापूर्वीं निवेदन व आश्वासन देऊन ही तसेच ठेवल्यामुळे त्या भागातील अनेक घराचे सांडपाणी रस्त्यावर व मोकळ्या जागेत सोडल्यामुळे डेंगू,मलेरिया आजारानी नागरिक त्रस्त झाले आहेत. तरीही तो पुर्ण होऊ शकला नाही. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या भागातील नागरिकांनी युवासेना शहरप्रमुख शिवव्याख्याते सचिन नागापुरे यांच्याशी संपर्क केला असता. त्यांची तात्काळ दखल घेऊन नगरपरिषद मधील बांधकाम विभागप्रमुख सोमनाथ गर्जे यांच्या कडे युवासेना शहरप्रमुख सचिन नागापुरे यांनी शिवसेना तालुकाप्रमुख भगवानराव दराडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन येत्या पंधरा दिवसा मध्ये अर्धवट राहिलेला रस्ता व गटार तात्काळ पुर्ण करुन द्यावा अन्यथा शिवसेना युवासेना तीव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भगवानराव दराडे यांनी सांगितले की हा रस्ता व गटार ही ठेकेदारा कडून काम करुन घेण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. तरीही ती पुर्ण झाली नाही. येत्या पंधरा दिवसात पुर्ण करुन त्रस्त नागरिकांची मागणी ची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन नगरपालिका व ठेकेदारा च्या विरोधात केले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असून या निवेदनावर सचिन नागापुरे युवासेना शहरप्रमुख, भगवानराव दराडे तालुकाप्रमुख, नंदकुमार डाळिंबकर, विकास दिनकर, मधुकर चन्ने, किशोर कराड,श्रीकांत काळोखे, माजी शहरप्रमुख भाऊसाहेब धस , आर्दश काकडे ,संजय राजगुरु , गणेश सोनटक्के , मंगेश राठोड , नवनाथराव चव्हाण, प्रशांत पगारे आदी च्या निवेदनावर सह्या केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments