पाथर्डी – आगसखांड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व सहशिक्षकाने शाळेतील विद्यार्थ्यान समोर बेशिस्तीचे प्रदर्शन करत शुल्लक कारना वरून एकमेकांना अश्लील शिवीगाळ व बाचाबाची केल्या बाबत संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई व्हावी या मागणीसाठी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसान आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आगसखांड येथील मुख्याध्यापक गंगा सुपेकर हे शालेय वेळे व्यतिरिक्त इतर वेळी त्यांच्या भालगाव गावी ग्रामपंचायत प्रचार व निवडणूक प्रक्रियेत व्यस्त होते मात्र या कालावधीत त्यांच्यावर शालेय पोषण आहार पूर्तता करण्याची जबाबदारी असताना त्यांनी ती पूर्ण केली नाही त्यामुळे त्यांच्या पश्चात विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला नाही व त्रास सहन करावा लागला सुपेकर हे परत आल्यावर त्यांना सह शिक्षक गोल्हार यांनी याबाबत जाब विचारला मात्र यावरून दोघा शिक्षका दरम्यान शाळेच्या आवारात विद्यार्थ्या समोर शिवीगाळ व वाद झाले याबाबत समाज माध्यमे व वृत्तपत्रातून बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या.
याबाबत
ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी करत शाळेला शाळे ठोकण्याचा
इशारा दिला होता त्याच अनुषंगाने पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर
जगदीश पालवे व गटशिक्षण अधिकारी अनिल भवर यांनी सदरील शाळेत भेट देऊन शाळेची दप्तर
तपासणी व स्थानिकांची विचारपूस करून संबंधित मुख्याध्यापक व सहशिक्षकाला जाब विचारला
होता व त्याच अनुषंगाने संबंधित मुख्याध्यापक व सहशिक्षकाने गैरसमजुरीतून
एकमेकांना शिवीगाळ व बाचाबाची केल्याबाबत लेखी माफीनामा व हमीपत्र दिले होते व त्यातूनच
गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित मुख्याध्यापक व सहशिक्षक यांना
महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम १९६७ चा ३ चा भंग केल्या प्रकरणी नोटीस देवून लेखी
खुलासा मागितला होता.
एवढा मोठा गैरप्रकार होऊनही ठोस कारवाई न झाल्याने आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते गोरक्ष ढाकणे,भास्कर दराडे,आबासाहेब जयभाय,कृष्णा पांचाळ,देविदास
प्रतिक्रिया – आमच्यात शालेय
कामकाजा वरून किरकोळ स्वरूपाचे मतभेद झाले होते,आमच्यात शिवीगाळ झालेली नाही,आमच्यातील
वाद मिटले आहेत,राजकीय आकसबुद्धीने आम्हाला लक्ष केले जात आहे,आम्ही चौकशीला
सामोरे जाण्यास तयार आहोत. - गंगा सुपेकर मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा आगसखांड
प्रतिक्रिया – ज्ञानदानाचे
काम चांगले व्हावे हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो त्यासाठी मुख्याध्यापकांशी चर्चा
करताना थोडे मतभेद झाले होते ते आता संपले आहेतआमचे काम आमच्या विद्यार्थ्यांच्या
शिक्षणाच्या दर्जा वरून दिसेल - विठ्ठल गोल्हार सह शिक्षक जि.प.प्रा.शाळा आगसखांड
0 Comments