करंजी - कुस्ती हा खेळ आता पुरुषापुरता मर्यादित राहिला नसुन, कुस्तीतील पुरुषांची मक्तेदारी मुलींनी मोडीत काढली असल्याचे मत
शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख रफिक शेख यांनी पै.गौरी मुखेकर हिच्या सत्काराप्रसंगी
बोलताना व्यक्त केले.
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील पै. गौरी नामदेव मुखेकर हिने या
महिन्यात इंदापुर जिल्हा पुणे येथे झालेल्या ज्युदो कुस्ती स्पर्धेत पुणे विभागात
प्रथम क्रमांक मिळवुन गोल्ड मेडल मिळविले. आता पै. गौरी हिची राज्यस्तरीय
स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यानिमित्त ग्रामस्थ व रफिक शेख मित्र मंडळाच्यावतीने
गौरी मुखेकर हिचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी रफिक शेख बोलत होते. ते पुढे
म्हणाले कुस्ती हा खेळ फक्त पुरुषांचा खेळ समजला जात होता, पण आता या खेळातही मुलींनी पुरुषांच्या बरोबरीने यश संपादन केल्याने
या खेळातील पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. पै. गौरी हिने कुस्तीत
उल्लेखनीय कामगिरी करुन करंजी परिसराचेच नव्हे तर तालुक्याचे नाव मोठे केले.
या सत्काराच्या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख रफिक शेख, सोसायटीचे माजी चेअरमन महादेव अकोलकर, सुरेश नाना साखरे,रावसाहेब
दानवे, मार्केट कमिटीचे संचालक अशोक अकोलकर, भाऊसाहेब अकोलकर, अंबादास
कारखेले, मुरडेमामा, मुरलीधर
मोरे, छगनराव क्षेत्रे, नामदेव मुखेकर, मुन्नाभाई
बेकरीवालेसह अनेक मान्यवर हजर होते.
0 Comments