पाथर्डी - तालुक्यातील चिचोंडी येथील श्री आनंद जैन
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या निधीतुन
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने ग्रामस्थांनी आमदार तनपुरे यांचे आभार मानले
आहेत.
पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथील श्री आनंद जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक
विद्यालयात बाहेरील युवकांचा नेहमीच त्रास होत होता. विद्यालयाच्या परिसरात
गुंडगिरी, दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढत चालली
होती याचा मोठा त्रास विद्यार्थी, विद्यार्थीनी,पालक, व शिक्षकांना नेहमीच होत होता.ग्रामस्थांनी व पालकांनी
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे या विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची
मागणी करताच आमदार तनपुरे यांनी या मागणीची दखल घेवुन आपल्या निधीतुन या
विद्यालयात सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला. या
विद्यालयातील सीसीटीव्ही पाथर्डी पोलिस स्टेशन जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयाशी
जोडण्यात आल्याने विद्यालयाबाहेरील रोडरोमिओचा व गुंडाचा बंदोबस्त होईल. या
विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष खेडकर, घोरपडे, गुंदेचा, पालवे, यांनी ग्रामस्थांचे व आमदार तनपुरे यांचे आभार मानले आहेत.
या विद्यालयात सिसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे विद्यार्थी, पालक, ग्रामस्थात समाधान व्यक्त करण्यात येत असुन राष्ट्रवादीचे
तालुकाउपाध्यक्ष अंबादास डमाळे, संतोष गरुड, चेअरमन पोपटराव आव्हाड, रमेश गिते,वैभव गरुड, नागेश आव्हाड, सज्जन शेख, बादशहा शेख, चंद्रकांत आव्हाडसह अनेकांनी आमदार तनपुरे यांचे आभार मानले
आहेत.
0 Comments