भा.ज.पा भटक्या विमुक्त आघाडी उपाध्यक्ष पदी शिंदे यांची निवड

 


पाथर्डी - राजाराम गोविंद शिंदेधामणगांव (वैदू वस्ती)ता. पाथर्डीयांची भारतीय जनता पार्टीच्या पाथर्डी तालुका भटक्या विमुक्त आघाडीच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे भटक्या विमुक्त आघाडीचे अध्यक्ष नवनाथ नरोटे यांनी व आमदार मोनिका राजळे यांचे हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

               यावेळी राजाराम शिंदे हे पाथर्डी तालुका भटक्या विमुक्त आघाडीच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातूनभारतीय जनता पक्षाची विचारधारा व पक्षाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ भटक्या विमुक्त वर्गातील सामान्यापर्यंत देण्यासाठी कार्यरत राहतील असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. वैदू समाजातील सामान्य कार्यकर्त्यांला तालुका स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.


Post a Comment

0 Comments