अहमदनगर - भटके विमुक्त आघाडी भाजपा प्रदेश संघटक सरचिटणीस अशोकजी चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली भटके विमुक्त आघाडी कार्यकारणीच्या निवडी करण्यात आल्या यावेळी माणिकदौंडी हरिचातांडा येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन चव्हाण यांची भटके विमुक्त आघाडी भाजपा अहमदनगर जिल्हा युवा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी भटके विमुक्त आघाडी भाजपा अहमदनगर
जिल्हा अध्यक्ष राहुल कारखेले, पत्रकार निशाण
दातिर आणि भटके विमुक्त आघाडी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडी मुळे
हरीचा तांडा गावात आनंदाच वातावरण निर्माण झाले. हरिचातांडा ग्रामपंचायत सदस्य बबन
रामभाऊ चव्हाण यांनी पुढिल वाटचालीसाठी नितीन चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments