पाथर्डी
- श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर आज जगदंबा
मोहटादेवीस गंगाजलाने अभिषेक करून,पुण्याहवाचन करून देवीच्या शाकंभरी
नवरात्र उत्सवास प्रारंभ विश्वस्त अक्षय व सौ. आकांक्षा गोसावी यांच्या हस्ते करून प्रारंभ झाला.
पौरोहित्य देवस्थानचे पुजारी भूषण देवा साकरे, भास्करदेवा देशपांडे, विकास क्षीरसागर यांनी केले. उत्सव काळात दररोज श्री दुर्गा सप्तशती पाठांचे वाचन होणार असून शुक्रवार दि ६ जानेवारी २०२२ श्री शाकंभरी पौर्णिमेस सकाळी ७ वाजता होमहवन प्रारंभ होईल, सकाळी साडेअकरा
वाजता कुमारिका पूजन, महाआरती व पूर्णाहुती होईल.सायंकाळी सात वाजता महाआरती सायंकाळी ७.४०
वाजता महाप्रसाद
होईल.पौर्णिमेनिमित्त रात्री ९ वाजता ह.भ.प.श्री नामदेव महाराज बडे यांचे जाहीर
हरिकीर्तन होईल.भाविकांनी या पर्वकाळात देवी दर्शनाचा व
विविध धार्मिक कार्यक्रमांचा साथरोगांच्या बाबतीत शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन
करून लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी
अधिकारी सुरेश भणगे यांनी केले आहे.
0 Comments