मा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक गौरव दीन साजरा

माणिकदौंडी – येथील वाघोली वस्ती हरिचा तांडा येथे नायकीर सोगन दन (गौरव दिन) गौर सिकवाडी व गोरसेना या संघटने कडून साजरा करण्यात आला.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी डिसेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती म्हणून गौर बंजारा समाजाच्या वतीने दरवर्षी हा दिवस नायकीसौगन (गौरव दिन) म्हणून साजरा करण्यात येतो.यावेळी प्रल्हाद राठोड यांनी गौर सेना संघटनेच्या कार्याची माहिती दिली आणि समाज बांधवांना संघटित होण्याच्या आवाहन केले तर बाबासाहेब राठोड जिल्हा संयोजक यांनी मार्गदर्शन केले तसेच अशोक चव्हाण,आर के चव्हाण,किशोर राठोड,बबन चव्हाण,मोहन पवार यांनी देखील मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप चव्हाण यांनी तर स्वागत संगीता चव्हाण,सूत्रसंचालन प्रकाश राठोड यांनी केले तर विजय चव्हाण यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments