पांडुरंग माध्यमिक विद्यालयाला विजेतेपद

 


शेवगाव - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पार नुकत्याच पार पडलेल्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत वरूरच्या पांडुरंग माध्यमिक विद्यालयास मुलींच्या गोळा फेक प्रकारात एक विजेतेपद,एक उपविजेतेपद तसेच थाळी फेक प्रकारात एक उप विजितेपद प्राप्त झाले.

गोळा फेक प्रकारांमध्ये कु. राधिका भारत म्हस्के हिने १४ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक तर, थाळीफेकमध्ये कु.स्नेहल अशोक शिंदे हिने द्वितीय क्रमांक पटकावला.१६ वर्षे वयोगटात पुनम अशोक वावरे हिने गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. मुलांच्या १४ वर्ष वयोगटात राहुल रमेश तुजारे तृतीय क्रमांक तसेच कुस्तीमध्ये सुमित गरुड व यश वाघमारे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक पोपट काळे, बाळासाहेब उकिर्डे,प्रशांत लबडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिजभैया घुले पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.राजश्री घुले पाटील, शिक्षण संस्थेचे सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे, प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे, मुख्याध्यापक सुशीलकुमार नागपूरे ,सहशिक्षक राजेंद्र जमधडे ,विकास काळे जालिंदर शेळके,बाबासाहेब मुगुटमल ,शरद भोसले, रमेश वावरे ,साईनाथ रणसिंग, निलेश खंडागळे,सुधाकर घुले ,गोरक्ष लिंबोरे तसेच वरुर ग्रामस्थांनी कौतुक व अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments