त्रिदल सैनिक सेवा संघा तर्फे सन्मान

 

  

पाथर्डी – राज्यसेवा परीक्षेत माजी सैनिक निलेश पालवे यांनी यश संपादित करून पालवेंची उत्पादन शुल्क विभागात नियुक्ती झाल्या बद्दल त्रिदल सैनिक सेवा संघ तालुका पाथर्डी यांच्या वतीने आव्हाड महाविद्यालयातील सेमिनार हॉल या ठिकाणी भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना गोवर्धन गर्जे यांनी सांगितले कि,माजी सैनिकाची शासन सेवेत निवड होणे हि आमच्या संघटनेसाठी अभिमानाची बाबा आहे,येत्या कालावधीत त्रिदल संघटना तालुयातील आजी व माजी सैनिकांच्या व्यापक हितासाठी काम करणार आहे,तालुक्यातील सेवत असलेले व माजी सानिक यांच्या प्रत्येक अडचणी या माध्यमातून सोडवल्या जाणार असल्याचे गोवर्धन गर्जे यांनी यावेळी सांगितले.यावेळी निलेश पालवे यांनी त्यांचा त्रिदल सैनिक संघटनेने सन्मान केल्या बद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास त्रिदल सैनिक सेवा संघ तालुका पाथर्डी अध्यक्ष गोवर्धन विक्रम गर्जेउपाध्यक्ष रोहिदास एडकेसचिव शरद आव्हाडसहसचिव मधुकर चननेकोषाध्यक्ष प्रभाकर फुंदेकमिटी सदस्य विठ्ठल तांदळे,रामराव चेमटे व तसेच तालुक्यातील सर्व गावामधून संघटनेचे सभासद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments