कायदा आणि फायदा, विचार वेध

पाथर्डी (अॅड.संपतराव गर्जे) भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे व बहुभाषीक लोक रहात आहेत,भारताचे राज्य घटने नुसार जात, धर्म, लिंग, वंश या वरुन भेदभाव करता येणार नाही ही योग्य संकल्पना आहे. पंरतु भारत देशामध्ये दिवसेदिवस रुढ होत आलेली आंतर जातीय विवाह पध्दती किंवा त्यामधुन रूढ झालेली लिव्ह इन रिलेशनशिप संकल्पना दिवसेनदिवस मानवी जिवनासाठी घातक स्वरूप प्राप्त होवू  पहात आहे.

आंतरजातीय विवाह करीता जरी कायद्याने संमती दिली असली तरी अजुन अंतर जातीय विवाह संकल्पना भारतीय लोक स्विकारण्यास तयार नाहीत. एखादया मुला मुलीने अंतरजातीय विवाह केल्यास त्यास एक टक्का कुटुंबीय वगळता ९९ टक्के लोकांचा विरोध आहे त्यामुळे एखादया जोडप्याने आंतरजातीय विवाह अगर लिव्ह इन रिलेशनसिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतल्यास त्यास मुली कडील व मुला कडील लोक पसंद व मान्य करीत नाहीत. त्यामुळे मुलगी अंतरजातीय विवाहानुसार तिचे पती कडील ज्या कुटुंबात जाते तेथील लोक तिला स्विकारायला तयार नसतात एवढेच नाहीतर तिचे पतीचे नातेवाईक देखील तिचे पतीला व त्यांचे कुटुंबाला त्या बाबत टोमणे मारायला सुरु करतात व त्याचे परीणाम पतीचे कुटुंबीयातील लोक तिचे पतीच्या मागे लागलात व त्याचे कान भरवितात की, ही मुलगी आपल्याला नको आहे आपल्या कुटुंबाची समाजात प्रतिष्ठा आहे.

नातेवाईक व समाज आपल्याला नाव ठेवत आहे. त्यामुळे तिचे पतीला देखील हवी असलेली पत्नी नकोशी होते व तिला नको तो त्रास दयायला सुरु करतो त्याचे घरचे देखील टोमने मारुन तिला त्रास देण्यास सुरु करतात परंतु तिने तिचे आई वडिल भाऊ नातेवाईक यांचे इच्छे विरुध्द त्यांचेशी अंतरजातिय विवाह केलेला असल्याने ते देखील तिच्यावर नाराज असल्याने तिला त्रास झाला तरी देखील तिचे आई वडिल व नातेवाईक यांना सांगण्याची अंगर त्यांचेकडे जाण्याची तिची हिंम्मत होत नाही व ती तिचे पतीकडेच त्रास सहन करुन राहण्याची हिंम्मत धरते. तिचा पती व त्यांचे घरातील लोक याच गोष्टीचा गैरफायदा घेतात व त्यांचे लक्षात येते की, हिला हिचे आई वडिल व नातेवाईक यांनी सोडुन दिले आहे, ते तिला स्विकारीत नाहीत व तिला आपल्या शिवाय पर्याय नाही असे समजुन तिचा मानसिक व शारिरिक छळ करतात एव्हाणा तिचा श्रदधा व अफताब प्रकरण भावाने बहिणीचे शिर धडावेगळे करणे ऑनर किलिंग वगैरे पध्दतीने आयुष्यातुन संपवितात किंवा ना विलाजाने तिला आत्महत्याचा मार्ग स्विकारुन जिवन संपावे लागते.

ज्या मुलाने एखादया मुली बरोबर अंतरविवाह केला असल्यास मुलीकडील नातेवाईक त्या मुलाला कोणत्या ना कोणत्या पध्दतीने आयुष्यातुन संपवितात. त्यांनतर त्या गोष्टी बाबत समाजामध्ये, टिव्हीचॅनल्स, वर्तमानपत्रात चर्चा सुरु होते व असे झाले असते तर तसे झाले असते, तिचा जिव वाचला असता पंरतु या बाबी घडु नयेत या करीता खोलात जाण्याची गरज असुन ज्या गोष्टीला कायद्याने मान्यता आहे परंतु त्यास समाजाची मान्यता नाही अशा गोष्टी रोखण्यासाठी आजही ठोस उपाययोजना करता येतील का, या साठी काही विशिष्ट नियम तयार करता येतील का, किंवा अंतरजातीय विवाह पध्दती बंद करता येईल का, या बाबत विचार विनियम होणे व नियम करणे आवश्यक झाले आहे. दिवसेनदिवस आंतरजातीय विवाह पध्दतीमुळे जातीमध्ये व घरा घरामध्ये वाद निर्माण झाले आहेत व त्यांचे परिणाम मुला मुलीवर व त्यांचे कुटुंबीयावर भोगण्याची वेळ येत आहे व कुटुंबाचे कुटुंब बर्बाद होत आहेत व देशाचे तरुण

पिढीला कलंक लागल्याचे वाटत आहे व या मधुन समाजाने व तरुण पिढाने बोध घेणे आवश्यक आहे . अंतरजातिय विवाहास मान्यता देवुन आम्ही पुरोगामी असल्याचे भासवले जात आहे परंतु त्यापासुन फायद्या ऐवजी तोटे व विध्वंश जास्त प्रमाणत होत आहे. काही बाबी कायद्याने मान्य केलेल्या आहेत परंतु त्या बाबी समाज मान्य करीत नाही. काही बाबी समाजाने नियम म्हणुन मान्य केल्या आहेत परंतु त्या कायदयाला मान्य नाहीत. त्यासाठी एखादया बाबीची कायद्याने मान्यता देण्या बरोबरच तो कायदा, नियम समाजाणे स्विकारण्या करीता विविध माध्यमातुन समाजामध्ये प्रबोधन होणे आवश्यक आहे. अन्यथा समाजावर व तरुण पिढीवर पश्चाताप करण्याची वेळ येतच राहिल.लेखक -(अॅड.संपतराव गर्जे)


Post a Comment

0 Comments