श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थीनीची क्रीडा स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

 

अहमदनगर येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धांमध्ये विद्यालयाची विद्यार्थीनी वैभवी पाथरकर या विद्यार्थिनीने बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करत विभागीय स्तरावर होणाऱ्या बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत स्थान प्राप्त केले.तसेच विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यानी पाथर्डी पंचायत समिती शिक्षण विभागा अंतर्गत 'तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३' या क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यालयातील सर्वच सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात तालुक्यात अव्वल येण्याचा मान पटकावत विद्यालयाच्या उज्वल यशाच्या शिरपेचात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतही उज्वल यशाचा मानाचा तुरा रोवत विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा सविस्तर निकाल संकेत शेळके १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात तालुक्यात प्रथम येत जिल्हास्तरावर निवड झाली, चि ओंकार घुगे लांब उडी तालुक्यात प्रथम येत जिल्हास्तरावर निवड झाली, प्रेरणा पवार कुस्ती क्रीडा प्रकारात तालुक्यात प्रथम येत जिल्हास्तरावर निवड झाली, प्रज्ञा साबळे ४०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात तालुक्यात द्वितीय येत जिल्हास्तरावर निवड झाली, ओंकार घुगे १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात तालुक्यात द्वितीय येत जिल्हास्तरावर निवड झाली.

यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना संस्थेचे अध्यक्ष दिलीपशेठजी भांडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले तथा मार्गदर्शक शिक्षक आत्माराम साबळे, गणेश जगताप, सचिन गवळी, सोनाली सोनावणे, प्रविणा गोल्हार, अनिता कानडे, सुधीर पगारे, स्मिता चिंतामणी, प्रसाद मरकड, बंडू गाडेकर, सुरज आव्हाड, वैशाली घायाळ, सुनिता गोसावी, सायली डांगे तथा शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा होणमने व अनिकेत झेंड या सर्वांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments