मिरी
- तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागून
असलेल्या पाथर्डी तालुक्यातील कोल्हार गावाची ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार
पडली.या निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंचासह सर्व सदस्यांचे तालुक्यातील मिरी येथे
संतोष शिंदे मित्र मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
स्वर्गीय मोहनराव पालवे संचालित कोल्हार विकास पॅनलचे नेते बाळासाहेब पालवे, सरपंच राजु नेटके यांनी माजी सभापती
संभाजीराव पालवे यांच्या पॅनलचा पराभव करून घवघवीत यश मिळवले.या निवडणुकीच्या
निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत विजयी झालेले सरपंच व
सदस्यांचा संतोष शिंदे यांनी बाळासाहेब पालवे, सरपंच राजु नेटके,
गोरख पालवे, ईश्वर पालवे, संतोष पालवे,
पोपट पालवे, कैलास पालवे, सोपान पालवे,
संदीप पालवे, अभिजीत पालवेसह अनेकांचा सत्कार केला.या
कार्यक्रमाच्यावेळी संजय नवल ,संभाजी सोलाट,
संभाजी दारकुंडे,प्रदीप तुपे,आदिनाथ तागड,मंगेश म्हस्के, डॉक्टर श्याम कोरडे,
अशोक शिंदे, वैभव शिंदे, प्रतीक जगताप,
भोसले, नामदेव दारकुंडे, आप्पा जाधवसह अनेक मान्यवर हजर होते.
0 Comments