मोहटा देवस्थानने पर्यटनासाठी प्रस्ताव सादर करावेत – विजय कंठाळे

 

पाथर्डी - शासनाच्या मदतीतून मोहटा देवस्थाने वनविभागाच्या पर्यटनासाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी स्थानिक वनविभागाच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करावेत,निसर्ग पर्यटनासाठी मोहटादेवी गडाचा परिसर अत्यंत अनुकूल असून अशा विकास कामांमुळे तालुक्याचे अर्थकारण बदलू शकेल असे मत मणिपूर राज्यातील चांडेल जिल्ह्याचे उपवनसंरक्षक तथा तालुक्याचे सुपुत्र विजय कंठाळे यांनी व्यक्त केले.                          

श्री कंठाळे यांनी काल सहकुटुंब मोहटा देवस्थानला भेट देऊन महापूजा केली परिसरातील विकास कामांची पाहणी केली यावेळी देवस्थान समितीचे विश्वस्त डॉक्टर श्रीधर देशमुख  माजी विश्वस्त डॉक्टर ज्ञानेश्वर दराडे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे सहाय्यक अधिकारी भीमराव खाडे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी गडाच्या विकास कामांसह वनविभागाच्या जागेबाबत माहिती देताना सांगितले सुमारे दहा एकर जमीन वन विभागाकडून देवस्थान समितीकडे चार महिन्यांपूर्वी हस्तांतरित झाली आहे विश्वस्त मंडळाकडून याबाबतचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे वनविभागाची सुमारे 100 हेक्टर जमीन मंदिर परिसरात आहे . येथे नक्षत्र उद्यान ' ग्रह उद्यान ' निसर्ग परिक्रमा मार्ग योग व निसर्गोपचार केंद्र ' फुल झाडांचे आकर्षक उद्यान , सिन्नरच्या धर्तीवर गारगोटी संग्रहालय अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतले जावेत शिर्डी शिंगणापूर नंतर जिल्ह्यात मोहट्या चे स्थान आहे . सुदैवाने येथे वनविभागाची मुबलक जागा असून परिसरात च्या सर्वांगीण विकासाने तालुक्यासह जिल्ह्याच्या अर्थकारणासाठी पूरक ठरणार आहे. कंठाळे यांनी सर्व नकाशे व कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर बोलताना  म्हणाले नगर जिल्ह्याच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून विविध योजनांबाबत त्यांना महत्त्व पटवून देऊ . तालुक्याचे सुपुत्र व देवीभक्त या नात्याने शक्य ती सर्व मदत करू वनविभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीमुळे गडाच्या परिसराचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व वाढणार आहे .तालुक्यातील विविध महामार्गांमुळे दळणवळण व्यवस्था येत्या काळात अधिक सुलभ होऊन तालुक्यात भाविकांसह पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे .डॉक्टर ज्ञानेश्वर दराडे यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments