पाथर्डीतील गुन्हेगारी नियंत्रणासाठी लाक्षणिक उपोषण

पाथर्डी – तालुक्यातील वाढती गुन्हेगारी मुळे सामान्य जनतेचे जीवन जिकीरीचे झाले असून पोलीस यंत्रणेने अधिक तत्परतेने गुन्हेगारी रोखण्यासाठी कार्यान्वित होवून गुन्हेगारांचा बंदोबस्त करून सामान्य जनतेला अभय द्यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नागनाथ भारत गर्जे यांनी सोमवारी नाईक चौकात एक दिवस लाक्षणिक उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ते नागनाथ गर्जे यांनी तहसीलदार तथा पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,पाथर्डी शहरात गुन्हेगारीने थैमान घातले असून सर्व सामान्य जनता भयभीत जीवन जगत आहे.पाथर्डी शहरात दिवसा ढवळ्या चोऱ्या होताना दिसत आहे. घरफोडी होणे, महिलांचे अंगावरील दागिने पळवीने,मोबाईल चोरीला जाणे, बॅगेतील पैसे गायब होणे, खिसे कापणे, चार चाकी व दुचाकी गाड्या चोरीला जाने. इथपर्यंत नाहीतर रस्त्यावर एकट्या पायी चालणाऱ्या माणसाला पाहून त्याचा चेहन्यावर केमीकल स्प्रे मारून त्याला गुंगवने व त्याचे पलायन करून त्याला लुटणे, व लांब दुसऱ्या गांवी निर्जन स्थळी बेशुद्ध अवस्थेत टाकून देणे, यासारख्या भयानक गुन्हेगारीने शहरात उच्छाद मांडला आहे. पाथर्डी शहर महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे अव्वल शहर बनले आहे.

बिहार पेक्षा भयानक परिस्थीती आज पाथर्डी शहरात बनलेली आहे त्यामुळे शहरातील जनता भयभीत जीवन जगत आहे अनेक व्यापारी आणि नागरिक शहरातून स्थलांतर करीत आहेत. व शहराचे जन जीवन व भविष्य धोक्यात आले आहे.आणि इतकी भयानक परिस्थिती असताना देखील लोकप्रतिनिधी व समस्त प्रशासन यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून ते सुस्त आहेत, आणि त्यामुळेच भयभीत नागरिक गुन्हेगारांच्या भीतीने आपल्यावर अन्याय झाला तर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला येत नाहीत. पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये कमी पोलीसबळ असल्याने पोलीस यंत्रणा देखील हतबल झाली आहे, तरी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गुन्हेगारचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने कडक पावले उचलावीत पोलीस स्टेशन ला पोलिसांची संख्या वाढवावी व गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यासाठी व सुस्त प्रशासनाचे व लोकप्रतिनिधी चे लक्ष वेधण्यासाठी नागनाथ भारतराव गर्जे हे सोमवार दिनांक ०२/०१/२०२३ रोजी पाथर्डी शहर नाईक चौक येथे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments