सकल जैन समाजाचा पाथर्डी तहसिलवर मुक मोर्चा

 

पाथर्डी - झारखंड राज्यातील बावीस जैन तिर्थंकरांचे महानिर्वाण क्षेत्र असलेल्या पवित्र तीर्थ सम्मेदशीखरजीची पर्यटन क्षेत्र जाहीर केल्याचा निषेधार्थ आज पाथर्डी तालुका सकल जैन समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयावर मुक मोर्चा काढून पर्यटन क्षेत्राचा निर्णय रद्द करावा अशी मागणी तहसिलदार शाम वाडकर यांच्याकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नावाने हे निवेदन प्रशासनाकडे सादर केले गेले.जैन समाजाचे पवित्र तीर्थ सम्मेद- शीखरजी ऊर्फ पारसनाथ पर्वत झारखंड राज्यातील गिरडी जिल्ह्यातील छोटा नागपूर या ठिकाणी जैन धर्माचे २४ तिर्थंकर पैकी २२ तिर्थंकर हे या ठिकाणी तप करून मोक्ष गतीला गेले होते. यामुळे ही पावन भूमी जैन धर्मियांसाठी पवित्र व पावन तीर्थ आहे. या ठिकाणाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्याने जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. जैन धर्मियांची आस्था असणाऱ्या सम्मेद शीखरजी या पवित्र अशा स्थानाचे  टुरिझम क्षेत्रामुळे पावित्र्य दूषित होण्याची भीती आहे. त्यामुळे घोषित केलेले पर्यटन क्षेत्र हे रद्द करुन हा निर्णय त्वरीत बदलावा यासाठी आज निषेध मुक मोर्चा काढून जैन बाधवांनी मागणी केली गेली आहे. यावेळी जैन श्रवाक संघाचे अध्यक्ष सुभाष चोरडिया, जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे,सुरेश कुचेरिया,धरमचंद गुगळे,राजेंद्र मुथ्था,सुरेश गुगळे,आनंदकुमार चोरडिया, डॉ अभय भंडारी,अभय गांधी,राजेंद्र भंडारी, घेवरचंद भंडारी,सचिन भंडारी,चांदमल देसर्डा,अनिल खाटेर, राजेंद्र बाफणा, संजय गुगळे, अशोक भंडारी,पारस कर्नावट, धीरज गुंदेचा, राजेंद्र फिरोदिया, नितिन मुनोत,महेंद्र लोढा, पिंटू परमार, सुधिर शिंगवी, सचिन चोरडिया, निलेश खबिया, राजेंद्र गांधी,अमित लुणावत, विशाल मंडलेचा, संजय शेट्टी आदीसह जैन बांधव उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments