लोकनेते गोपीनाथ मुंडे संघर्ष पुरुष या विशेषाकांचे गोपीनाथ गडावर प्रकाशन

पाथर्डीस्व. लोकनेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जीवनावरील संघर्षमय जीवनाचे वर्णन करणारे संघर्ष पुरुष ह्या विशेषाकांचे प्रकाशन मुंडे साहेबांचे पाथर्डी येथील कट्टर समर्थक माजी शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष नागनाथ गर्जे यांनी मुंडे साहेबांच्या जयंतीचे औचीत्य सांधून पाचव्या विशेषाकांचे प्रकाशन गोपीनाथ गडावर लोकनेत्या पंकजा मुंडे व लोकप्रिय खासदार प्रितम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी नागनाथ गर्जे यांचे विशेषांक छापल्याबद्दल कौतुक केले. यावेळी राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चाचे अहमदनगर दक्षिणचे सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे व पाथर्डी तालुक्यातील मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक मुंडेभक्त प्रा.सुनीलजी पाखरे व इतर अनेक मान्यवर उपस्थीत होते. यावेळी उपस्थीत मान्यवरांना संघर्ष पुरुष या विशेषाकांचे वाटप करण्यात आले .


Post a Comment

0 Comments