पाथर्डी : तालुक्यातील शिरसाटवाडी गावच्या सरपंच सौ.भावना अविनाश पालवे यांना सरपंच सेवा संघाकडून दिला जाणारा यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.
सरपंच भावना पालवे यांचे पती अविनाश पालवे हे मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिरसाटवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. मागील वीस वर्षापासून ते समाजकार्यात असून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. कुठल्याही सरकारी कार्यालयात कामासाठी सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक, त्यांना येणाऱ्या अडचणी यामुळे त्रस्त झालेला तालुक्यातील सर्व सामान्य माणूस हा अविनाश पालवे यांच्याकडे येतो व आपले काम करून घेतो याच त्यांच्या कार्यामुळे तालुक्यात त्यांची कामाचा माणूस अशी वेगळी ओळख निर्माण झाली आहे.दोन वर्षांपूर्वी शिरसाटवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत अविनाश पालवे यांनी नवनिर्माण पॅनल करून निवडणूक लढविली व कामाच्या जोरावर ९-० ने जिंकली. सरपंच भावना पालवे यांनी गावामध्ये अनेक विकास कामे केली आहेत यामध्ये स्मशानभूमी बांधकाम, सात एलईडी हायमास्ट, भैरवनाथ मंदिर येथे सार्वजनिक शौचालय बांधकाम, तुळजाभवानी माता मंदिर येथे सार्वजनिक शौचालय बांधकाम, गावठाण मध्ये जिथे पोल तिथे मर्क्युरी, घुले वस्ती येथे सिमेंट रस्ता, कोंगे वस्ती येथे सिमेंट रस्ता, पाणीपुरवठा विहिरीवर पोलसह नवीन २५ केवीए ट्रांसफार्मर, सेवालाल मंदिर येथे कंपाउंड भिंत बांधकाम व मुरूम भराव, जि.प. शाळा येथे सीसीटीव्ही कॅमेरे सेट, जि.प.शाळा येथे टेबल खुर्च्या कपाट एलईडी टीव्ही, जि.प. शाळा व अंगणवाड्यांना टाक्या व नळ पाणीपुरवठा, व्यायामशाळा बांधकाम, जलजीवन मिशन आराखड्यात गावाचे नाव नसल्याने पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना मंजूर, पं.स. बांधकाम विभागात आंदोलन करून वर्षानुवर्षे न झालेला शेकडे वस्ती रस्ता डांबरीकरण करण्यास प्रशासनास भाग पाडले यांसह अनेक कामे झाली आहेत. याशिवाय ग्रामस्थांना कुठलीही अडचण असो अविनाश पालवे हे त्यांच्यासाठी २४ तास उपलब्ध असतात या त्यांच्या कार्याची दखल घेत सरपंच सेवा संघाकडून यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सौ.भावना अविनाश पालवे यांना जाहीर झाला असून २५ डिसेंबर २०२२ रोजी नगर येथे माऊली संकुलात हा पुरस्कार प्रदान केला गेला. शिरसाटवाडीच्या सरपंचांना प्रथमच आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याने सरपंचांचे व शिरसाटवाडीकरांचे तालुक्यात कौतुक होत आहे.
0 Comments