अहमदनगर - अल्पवयीन
मुलीचा पाठलाग करून तिचा हात धरून ओढत डब - याकडे चल म्हणून विनयभंग केल्याप्रकरणी
आरोपी नामे सलमान उर्फ माईकल एजाज शेख, वय
२७ वर्षे, रा. बेलदार गल्ली, मुकुंदनगर, अहमदनगर यास अहमदनगर येथील न्यायाधीश माधुरी एच.मोरे
अतिरिक्त व विशेष (पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून
भा.दं.वि. कलम ३५४, ३५४ ( ब ) तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे
संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम १२ नुसार दोषी धरून आरोपीस १ वर्षे सक्त मजुरी व
रूपये ३,००० रूपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी
कैदेची शिक्षा सुनावली आहे.
घटनेची थोडक्यात हकीगत की, अल्पवयीन पिडीत मुलगी ही तिची मैत्रिणीसोबत अरबी भाषेच्या क्लासला जात असताना, आरोपी हा फिर्याद देण्याच्या एक महिना अगोदर पासून तिचा पाठलाग करत होता. दिनांक १३.०३.२०१ ९ रोजी पिडीत मुलगी हि तिच्या मैत्रीणीसोबत संध्याकाळच्या सुमारास अरबी भाषेच्या क्लास वरून पुन्हा घरी जात असताना, आरोपीने तिचा हात पकडला व पिडीत मुलीच्या सोबत असलेल्या मैत्रिणीला तेथून हाकलून दिले. त्यानंतर आरोपी पिडीत मुलीला म्हणाला की, “ माझ्या सोबत डबरया मध्ये चल त्यास पिडीत मुलीने नकार दिला असता, आरोपीने तिचा हात धरून तिला जोराने ओढत घेवून जावू लागला. पिडीत मुलगी ही आरोपीच्या हातातून तिचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु आरोपी तिचा हात सोडत नव्हता. त्यावेळी पिडीत मुलीने आरडा - ओरडा केल्याने परिसरातील लोक तेथे जमा झाले नंतर आरोपी तेथून पळून गेला. सदरची घटना पिडीत मुलीने घरी आल्यानंतर तिच्या घरच्यांना सांगितली. त्यानंतर पिडीत मुलीने तिच्या वडिलांसोबत तोफखाना पोलिस स्टेशनला जावून आरोपी विरुध्द रितसर फिर्याद दिली. घटनेचा संपूर्ण तपास पोलिस उप निरीक्षक वैभव पेठकर यांनी करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले.
0 Comments