प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या महिलांना राजकारणात संधी केव्हा ?

 

मंगलताई राजेंद्र म्हस्के 

करंजी - महिलांना ५० टक्के आरक्षण असुनही याचा फारसा उपयोग होत नसल्याचेच दिसते,कारण त्या महिलेच्या पतीचे काम पाहुन राजकिय पक्षश्रेष्ठी महिलांना उमेदवारी देताना दिसतात. पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील काही महिलांचे काम उल्लेखनीय असून दुर्दैवाने गावाच्या पलिकडे यांना राजकारणात संधी मिळालेली नाही. 


सुनंदा राहुल गवळी 
पाथर्डी तालुक्यातील पश्चिमेकडील ३९ गावे राहुरी-नगर मतदार संघाला जोडलेली आहेत. मिरी जिल्हा परिषद गट आणि तिसगाव जिल्हा परिषद गटातील काही गावांचा या मतदार संघात समावेश आहे. यात मिरी, करंजी आणि तिसगाव ही मोठी गावे आहेत. या ३९ गावामध्ये अनेक महिला सरपंच म्हणुन काम पहात आहेत तर काही महिला १० वर्षाहून अधिक काळापासून गावाचा कारभार करित असतानाही या महिलांचा कोणत्याच पक्षाच्या श्रेष्ठींनी गावाच्या पलीकडच्या राजकारणात संधी दिली नाही. अशा महिलांचा उमेदवारीसाठी कधी विचार केला नाही. 

हिराताई अनिल गीते 

कौडगाव-त्रिभुवनवाडी-निबोंडीच्या सरपंच व शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ. मंगलताई राजेंद्र म्हस्के यांनी सरपंच म्हणुन व संघटनेच्या माध्यमातून महिलांचे अनेक बटत गटाची स्थापना करुन महिलांना सक्षम बनविले. मिरीच्या सरपंच सौ. सुनंदा राहुल गवळी यांनी मोठ्या गावाचा कारभार करताना अनेक गोर-गरिबांची कामे करुन गावाच्या विकासात भर घातली, आदर्शगाव ठरलेल्या लोहसर गावच्या सरपंच सौ. हिराताई गिते यांचे लोहसर गाव आदर्श करण्यात सिंहाचा वाटा आहे. त्यांची संयमाची भुमिका नेहमीच गावासाठी, समाजासाठी फायद्याची ठरली, खांडगाव-जोहारवाडीच्या उपसरपंच सौ.कविता सावंत यांनी सरपंच व उपसरपंच म्हणुन काम करताना शासनाच्या अनेक योजना दोन्ही गावात राबविल्या. 


कविता मछीद्र सावंत 

यांच्याबरोबर या परिसरातील अशा अनेक महिलांनी गावाच्या कारभारात आपला ठसा उमटविला आहे. पण दुर्दैवाने अशा प्रतिभावान महिलावर नेहमीच अन्याय करण्यात आला. ज्या जिल्हा परिषद गटात किंवा गणात महिलासाठीचे राखीव आरक्षण असते अशा ठिकाणी सक्षम व प्रशासनाच्या कामाचा अनुभव असणाऱ्या महिलांना संधी दिल्यास या महिला गणातील व गटातील प्रश्न मार्गी लावु शकतात असा विश्वास या भागातील अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


Post a Comment

0 Comments