मिरी - ठाकरे सरकारने औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव केले तश्याच प्रकारे अहमदनगर शहराचे नाव अहिल्या नगर करावे अशी मागणी मिरी येथील जेष्ठ नेते राजीनामा तागड व समर्थकांनी केले आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या ठाकरे सरकारने केलेल्या नामांतरावर शिंदे
सरकारने शिक्कामोर्तब केले. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील
जामखेड तालुक्यातील चोंडी येथे झालेला आहे. या जिल्ह्याला होळकर शाहीची परंपरा
लाभलेली आहे. अहमदनगर शहराचे नाव अहिल्याबाईनगर करण्याची मागणी आता जोर धरू लागली
आहे. धनगर समाजाचे नेते भाजपाचे विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर आणि प्रा. राम
शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्याबाईनगर
नामकरण करावे यासाठी मोठा लढा दिला होता.
![]() |
राजु मामा तागड |
आता शिंदे व भाजप सरकारने राज्यातील दोन कोटी धनगर समाजाची अस्मिता कायम रहावी
यासाठी हे नामांतर होणे गरजेचे असल्याचे म्हटले असुन ना. राधाकृष्ण विखे पाटील
यांनी आगामी अधिवेशनात हा ठराव मांडुन मंजुर करुन घ्यावा अशी या भागातील धनगर
समाजाची मागणी आहे. २०१९ सालच्या धनगर समाजाला दिलेल्या सवलती शिंदे सरकारने पुन्हा
सुरु केल्या, त्याप्रमाणेच अहमदनगरचे नाव या सरकारने
अहिल्याबाईनगर करावे अशी मागणी राजुमामा तागड, विठ्ठलराव चांगुलपाई,आनिल साबळे, किशोर भुसारी, सचिन भुसारी, मयुरतात्या तागड, आदिनाथ शिंदेसह अनेक मान्यवरांनी केली आहे.
0 Comments