मिरी-तिसगाव पाणी योजनेसाठी १५५ कोटी

 

करंजी - मिरी-तिसगावसह पाथर्डी तालुक्यातील ३३ गावाच्या पाणी योजनेसाठी १५५ कोटी रुपयांचा निधी आघाडी सरकारच्या काळात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मंजुर करुन घेतला असुन हे काम प्रगतीपथावर असल्याने याचे श्रेय फक्त आमदार तनपुरे यांनाच असुन ते इतरांनी घेवु नये असा इशारा तनपुरे समर्थकांनी आज एका बैठकीत दिला. 

पाथर्डी तालुक्यातील मिरी-तिसगावसह ३३ गावातील पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर असुन जनजीवन मिशन अंतर्गत पाथर्डी तालुक्यातील ३३ गावातील पिण्याच्या पाण्याचा कायमचा दुष्काळ हटणार आहे. या योजनेसाठी १५५ कोटी ५९ लाख खर्चाच्या योजनेस तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली होती. दि. ३० जुलै २०२१ ते दि. १८ जुन २०२२ या काळात जिल्हा स्तरावर व मंत्रालयस्तरावर तब्बल १६ बैठका घेवुन हा प्रश्न आमदार तनपुरे यांनीच मार्गी लावल्याचे तनपुरे समर्थकांनी बैठकीत सांगितले.तांत्रिक समितीची मान्यता १६ मार्च २०२२ रोजी मिळाली तर योजनेचा कार्यारंभ आदेश ३० सप्टेंबर २०२२ नुसार झालेला आहे.या योजनेसाठी शिराळ ते तिसगांवकरता स्वतंत्र पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

या योजनेत समावेश असलेले चिचोंडी ,करंजी, लोहसर, मांडवे, मोहोज बु, मोहोज खु, रेणुकाईवाडी, रुपेवाडी ,शिराळ, तिसगांव, त्रिभुवनवाडी, धारवाडी, कडगांव, कौडगांव, निंबोडी, देवराई, घाटशिरस, डमाळवाडी, खांडगांव, जोहारवाडी ,सातवड शिरापुर, करडवाडी व नगर तालुक्यातील पांगरमल,मजले चिंचोली तसेच राहुरी तालुक्यातील कात्रड व गुंजाळे आदी गांवात नव्याने जलकुंभ उभारणी होणार आहे. या योजनचा कार्यांरभ आदेश होवुन गावागावांतील अंतर्गत पाईपलाईन कामे बहुतांशी ठिकाणी झालेली असुन काही ठिकाणी सुरु आहेत. केशवशिंगवे,पांगरमल, शिराळ, कोल्हार आदि गावात जलकुंभाचे सर्वेक्षण आखणी कामे सुरु आहे.मतदार संघातील पाथर्डी तालुक्यातील मिरी तिसगांव व इतर ३३ गावातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार असुन यापुर्वी हि योजना फक्त ३० गावांकरीता कार्यान्वीत होती.

मतदार संघातील सातवड,निंबोडी,त्रिभुवनवाडी, कौडगांव, शिरापुर,करडवाडी देवराई आदि गावांचा या योजनेत नव्याने समावेश करण्यात आल्याने या गावांचाही पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघाला आहे. हे काम आमदार, खासदारच करु शकतात असा टोलाही या बैठकीत कार्यकर्त्यांनी विरोधकांना लगावला.तिसगाव येथे झालेल्या या बैठकीस अंबादास डमाळे, अमोल वाघ, पोपटराव आव्हाड, राजेंद्र म्हस्के, जालिंदर वामन, भीमराज सोनवणे, देवेंद्र गिते, अजय पाठक, नितीन लोमटे, सुधाकर वांढेकर, के. एम. मचेसर, विष्णु पालवे, राजु पालवेसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते.


Post a Comment

0 Comments